यावर एलोपथी, होमियोपथी, आयुर्वेदिक अशा सर्व प्रकारात औषधं आहेत. आयुर्वेदातही चरक संहिता आणि सुश्रुत संहितेतही डोकेदुखीवर उपचार सांगितले आहेत. सुश्रुत संहितेनुसार, डोकेदुखी मुख्यतः पाच प्रकारांत विभागली जाते: वातज, पित्तज, कफजा, त्रिदोषज आणि क्रिमिज.
Mouth Ulcers : तोंडातल्या फोडांवर घरगुती उपाय, दुखणं, जळजळ होईल कमी, या टिप्स ठरतील उपयोगी
चरक संहितेच्या सूत्रस्थानाच्या सतराव्या अध्यायातही या प्रकारांचा उल्लेख आहे आणि त्यांचा उगम तीन दोषांच्या (वात, पित्त आणि कफ) असंतुलनावर आधारित असल्याचं मानलं जातं. पोटाच्या विकारांशी देखील हे संबंधित आहे. प्रत्येक दोषानं ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात.
advertisement
वातज डोकेदुखी म्हणजे काय ?
वातज डोकेदुखीत मुख्यत: मानसिक थकवा, झोपेची कमतरता, जास्त चिंता आणि बद्धकोष्ठता यासारखी लक्षणं दिसतात. यामुळे डोकं दुखण्याची तीव्रता अधिक असते, जी रात्री वाढू शकते. यासाठीचे उपचार सोपे आहेत. तेल मालिश, तूप किंवा दूध यासारख्या गरम पदार्थांमुळे डोकेदुखी कमी होते.
पित्तज डोकेदुखी
पित्तज डोकेदुखीची मुख्य लक्षणं म्हणजे डोक्यात जळजळ, डोळ्यांत उष्णता जाणवणं, खूप तहान लागणं आणि चिडचिड होणं. या प्रकारच्या डोकेदुखीत, चंदनाचा लेप लावणं, थंड पदार्थ खाणं आणि विश्रांती यासारखे थंड उपचार फायदेशीर मानले जातात.
कफज डोकेदुखी
कफज डोकेदुखीत प्रामुख्यानं जडपणा जाणवतो. आळस, झोप आणि नाक बंद होणं यासारखी लक्षणं यात दिसतात. सहसा थंडी, आर्द्रता किंवा कफ जास्त असलेल्या आहारामुळे हा त्रास होतो. नस्य, गरम पाण्याची वाफ श्वासानं घेणं आणि कफहार औषधं ही यासाठीची उपयुक्त उपचार पद्धत मानली जाते.
मायग्रेन
सुश्रुत संहितेत, मायग्रेन या डोकेदुखीला अर्धावभेदक म्हटलं आहे. यात वेदना फक्त डोक्याच्या एकाच बाजूला होतात. यात एकच बाजू खूप तीक्ष्ण दुखते. अनेकदा प्रकाश किंवा आवाजाची संवेदनशीलता वाढते तेव्हा हा त्रास होतो. वात आणि पित्त दोषांच्या प्राबल्यामुळे ही डोकेदुखी जाणवते. त्यावर नेस्य क्रिया, शिरोधारा, विश्रांती आणि मानसिक शांती देणाऱ्या पद्धतींनी उपचार केले जातात.