Belly Fat : रोज फिरता तरी पोटावरची चरबी कमी होत नाही ? या कारणांचा विचार करा, हृदयरोगतज्ज्ञांनी दिलेला सल्ला ऐका

Last Updated:

तंदुरुस्त असावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी आहारात बदल किंवा व्यायाम असे प्रयत्न केले जातात. पण बऱ्याचदा संपूर्ण शरीर बारीक आणि पोट फुगलेलं दिसतं. त्यामुळे फिरणं, आहार या प्रयत्नांचं फलित मिळताना दिसत नाही. यामागची कारणं आणि ते टाळण्यासाठी काय करायचं याविषयीची माहिती.

News18
News18
मुंबई : प्रत्येकालाच तंदुरुस्त दिसावं आणि शरीर सडपातळ असावं असं वाटतं. यासाठी आहारात बदल किंवा व्यायाम असे प्रयत्न केले जातात. पण बऱ्याचदा संपूर्ण शरीर बारीक आणि पोट फुगलेलं दिसतं. त्यामुळे फिरणं, आहार या प्रयत्नांचं फलित मिळताना दिसत नाही.
याबद्दल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आलोक चोप्रा यांनी सांगितलेल्या काही टिप्स महत्त्वाच्या आहेत.
पोटाची चरबी वाढण्याची कारणं आणि पोटाची चरबी कमी करण्याचे मार्ग
वाईट आहार
नाश्त्यात ब्रेड, दुपारच्या जेवण भात आणि रात्रीच्या जेवणात रोटी आणि त्या दरम्यान समोसा यासारखे जंक फूड खाल्ले तर शरीराला यातून खूप जास्त कार्बोहायड्रेट्स मिळतात. यामुळे पोटावर चरबी येऊ शकते.
advertisement
ताणतणाव आणि इमोशनल इटिंग
कामाचे जास्त तास, सततचा ताण आणि झोपेचा अभाव यामुळे देखील पोटावर चरबी येऊ शकते. तसंच काहींना भावनेच्या भरात खाण्याची सवय असते. अशावेळी जास्त खाल्लं जातं, त्यामुळेही चरबी वाढते.
कमी हालचाल
पुरेसा व्यायाम करत नसल्यानं आणि चालणं खूप हळू असलं तर त्याचा शरीरावर फारसा परिणाम होत नाही. वर्षानुवर्षे चालण्याचा व्यायाम नियमित करणाऱ्यांनाही पोटाची चरबी कमी करण्यासाठीचं उत्तर सापडलेलं नसतं.
advertisement
अन्नाची गुणवत्ता
आहारात खूप जास्त प्रक्रिया केलेल्या अन्नाचा समावेश असेल तर पोटाची चरबी दिसायला सुरुवात होते. कारण यात फायबर कमी असतं. फायबरमुळे पचन चांगलं होतं. खूप प्रक्रिया केलेलं अन्न खाल्ल्यानं पोट फुगतं. प्रत्येक जेवणासोबत दूध, दही किंवा चीज खाण्याचा कोणताही विशेष फायदा नाही असंही तज्ज्ञांनी सांगितलं. त्यांच्या सल्ल्यानुसार, विशेषतः दुग्धजन्य पदार्थ दिवसातून एकदाच खावेत किंवा प्यावेत.
advertisement
अनुवांशिक कारणं
काही गोष्टी अनुवांशिकरीत्या आपल्याकडे आलेल्या असतात. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा प्रकार असा असतो की पोट फुगतं. अशावेळी केवळ आहार नाही तर अनुवांशिक कारणांमुळेही चरबी वाढू शकते.
योग्य आहार, योग्य व्यायामानं शरीर सुस्थितीत राहण्यास मदत होते. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Belly Fat : रोज फिरता तरी पोटावरची चरबी कमी होत नाही ? या कारणांचा विचार करा, हृदयरोगतज्ज्ञांनी दिलेला सल्ला ऐका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement