ही लक्षणं बहुतेकदा आपल्या पायांत प्रथम दिसून येतात, पण याकडे दुर्लक्ष केलं जातं. ही लक्षणं लवकर ओळखली तर व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता लवकर दूर करता येते. पाहूयात ही लक्षणं कोणती ?
Cinnamon : दालचिनी करेल त्वचेचं रक्षण, जाणून घ्या वापरण्याची पद्धत
पायांत मुंग्या येणं- पायांत सुया टोचल्यासारखं वाटणं हे व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचं एक प्रमुख लक्षण आहे. तळवे किंवा बोटांमधे मुंग्या येणं सुरू होतं आणि कधीकधी हे प्रमाण वरच्या दिशेनं पसरू शकतं.
advertisement
बोटं सुन्न होणं - बोटांना टोचणं किंवा इतर स्पर्श, दाब न जाणवणं हे देखील या लक्षणांचा एक भाग आहे.
पायाच्या स्नायूंत कडकपणा - व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे स्नायूंच्या समन्वयात बिघाड होऊ शकतो. यामुळे स्नायूंमधे ताण, कडकपणा किंवा पायांच्या स्नायूंमधे कमकुवतपणा येऊ शकतो, ज्यामुळे चालणं देखील कठीण होऊ शकतं.
Diabetes Management : साखर सोडल्यानं काय होतं ? मधुमेहाचं प्रमाण कमी होतं का ?
पाय थंड पडणं किंवा पाय पिवळे पडणं - व्हिटॅमिन बी 12 हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊ शकतो, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह बिघडतो. याचा थेट परिणाम पायांवर होतो, ज्यामुळे पाय थंड होऊ शकतात आणि त्वचेचा रंग पिवळा होऊ शकतो.
पायात जळजळ - काहींना पायाच्या तळव्यांमधे किंवा संपूर्ण पायात तीव्र जळजळ जाणवू शकते, जी खूप त्रासदायक असू शकते.
यापैकी कोणतीही लक्षणं सतत जाणवत असतील, तर त्यांना सामान्य थकवा किंवा वृद्धत्वाचं लक्षण म्हणून दुर्लक्ष करू नका. व्हिटॅमिन बी 12 दीर्घकालीन कमतरतेमुळे मज्जासंस्थेला कायमचं नुकसान होऊ शकतं, ज्यावर उपचार करणं कठीण होऊ शकतं.
