Cinnamon : जेवणाप्रमाणेच त्वचेसाठीही उपयुक्त - दालचिनी, मास्कमुळे चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दालचिनीतले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेला आतून बरं करतात. मुरुमांसाठी मध आणि दालचिनीचा मास्क, चमकदार त्वचेसाठी ओटमील आणि दालचिनीचा फेस पॅक वापरता येतो. जाणून घेऊया दालचिनीबरोबर विविध जिन्नस कसे वापरायचे.
मुंबई : दालचिनीचा स्वाद जेवणाची रंगत वाढवतो. तसंच ही दालचिनी प्रकृतीसाठी त्यातूनही विशेषत: त्वचेसाठी गुणकारी आहे.
दालचिनीतले अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेला आतून बरं करतात. मुरुमांसाठी मध आणि दालचिनीचा मास्क, चमकदार त्वचेसाठी ओटमील आणि दालचिनीचा फेस पॅक वापरता येतो. जाणून घेऊया दालचिनीबरोबर विविध जिन्नस कसे वापरायचे.
मुरुमांसाठी मध आणि दालचिनीचा मास्क - मुरुमांचा त्रास होत असेल तर मुरुमांसाठी मध आणि दालचिनीचा मास्क तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. दालचिनीचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांना कारणीभूत असलेल्या जंतूंना मारतात. मास्क बनवण्यासाठी, अर्धा चमचा दालचिनी पावडर एक चमचा मधात मिसळा. ही पेस्ट मुरुमांवर लावा आणि रात्रभर तसंच राहू द्या. यामुळे मुरुम कोरडे होतात आणि त्यांचे डागही कमी होतात.
advertisement
चमकदार त्वचेसाठी ओटमील आणि दालचिनीचा फेस पॅक - हा पॅक त्वचा आतून स्वच्छ करतो आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतो, ज्यामुळे त्वचेवर ग्लो येतो. यासाठी दोन चमचे ओटमील, पाव चमचा दालचिनी पावडर आणि थोडं दूध मिसळून जाड पेस्ट बनवा. चेहऱ्यावर पंधरा मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर थंड पाण्यानं धुवा. हे एक उत्तम एक्सफोलिएटर आहे, ज्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होते.
advertisement
ओठांसाठी उपयुक्त - चिमूटभर दालचिनी पावडर थोड्या पेट्रोलियम जेलीत मिसळा. ओठांवर हळूवारपणे घासून घ्या. यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होतो आणि ओठ गुलाबी आणि मऊ दिसतात.
काळ्या डागांसाठी लिंबू आणि दालचिनी - लिंबू आणि दालचिनीमधील व्हिटॅमिन सी एकत्रितपणे काळे डाग आणि रंगद्रव्य कमी करण्यास मदत करते. एक चमचा लिंबाचा रस आणि पाव चमचापेक्षा कमी दालचिनी पावडर मिसळा. हे द्रावण फक्त काळ्या डागांवर कापसानं लावा आणि पाच मिनिटांनी धुवा. लिंबू वापरल्यानंतर उन्हात बाहेर जाऊ नका.
advertisement
रक्ताभिसरण वाढवण्यासाठी दालचिनी तेल - दालचिनीच्या तेलानं मसाज केल्यानं त्वचेत रक्ताभिसरण वाढतं, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चांगली आणि गुलाबी दिसते. नारळ तेलात दोन-तीन थेंब दालचिनी तेल घाला किंवा दालचिनीची एक छोटी काडी गरम करा. हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करा. यामुळे तुमची त्वचा घट्ट होते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 9:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cinnamon : जेवणाप्रमाणेच त्वचेसाठीही उपयुक्त - दालचिनी, मास्कमुळे चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक


