तरुणांमधे कोलन कॅन्सर म्हणजेच मोठ्या आतड्यांचा कर्करोग वाढण्याची कारणं कोणती आहेत आणि हे उद्भवू नये यासाठी काय करता येणं शक्य आहे ते समजून घेऊया.
आधुनिक जीवनशैली - दिनचर्येत सतत बदल होणं, रात्री उशिरापर्यंत जागरण, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढलेला ताण ही कोलन कर्करोगा होण्यामागची मुख्य कारण ठरु शकतात.
आहारातील बदल - प्रक्रिया केलेले अन्न म्हणजेच प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, जास्त प्रमाणात लाल मांस खाणं आणि फायबरयुक्त पदार्थ जसं की - धान्य, फळं, भाज्या यांचा अभाव यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो.
advertisement
Skin Toner : नैसर्गिक टोनर बनवण्यासाठी DIY कृती, त्वचेचा पोत राहिल चांगला
लठ्ठपणा आणि मधुमेह - तरुणांमधे लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणामुळे कोलन कर्करोगाचा धोका वाढला आहे.
मद्यपान आणि धूम्रपान - किशोरावस्थेत अल्कोहोल आणि तंबाखूजन्य पदार्थांचा वापर हेदेखील कोलन कर्करोगाचं एक कारण ठरु शकतं.
अनुवांशिक घटक - काही प्रकरणांमधे, कोलन कर्करोग अनुवांशिक परिस्थितीमुळे होऊ शकतो.
पर्यावरणीय घटक - प्रदूषण, कीटकनाशकं आणि हानिकारक रसायनांच्या संपर्कात आल्यानंही कोलन कर्करोगाचा धोका वाढतो.
कोलन कर्करोगाचे लवकर निदान होणं उपचारांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोलन कर्करोगाची खालील लक्षणं लक्षात ठेवा :
आतड्यांच्या सवयींमधे बदल - बऱ्याच काळ बद्धकोष्ठता होणं किंवा अतिसार, विष्ठेच्या प्रमाणात किंवा आकारात बदल.
शौचात रक्त - शौचात रक्त हे हे कोलन कर्करोगाचं लक्षण आहे.
पोटाच्या समस्या - सतत पोटदुखी, पेटके येणं, गॅस, पोट फुगणं किंवा जडपणा जाणवणं.
बद्धकोष्ठता - मलविसर्जनानंतरही मलविसर्जन होत नसल्याची भावना होणं.
वजन कमी होणे - कोणतंही कारण किंवा प्रयत्न केलेले नसताना वजन वेगानं कमी होणं.
Skin Care : हिवाळ्यातही चेहरा करेल ग्लो, आहारातले बदल ठरतील महत्त्वाचे
थकवा आणि अशक्तपणा - अशक्तपणामुळे सतत थकवा येणं. आतड्यांमधून रक्तस्त्राव झाल्यामुळे असा थकवा, अशक्तपणा येऊ शकतो.
कोलन कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी, जीवनशैली सुधारणं महत्वाचं आहे. नियमित व्यायाम, निरोगी आहार, धूम्रपान आणि मद्यपान टाळणं, ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन आणि योग्य वजन या सर्व गोष्टींमुळे कोलन कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. तसंच 45 वर्षांनंतर नियमित तपासणी देखील आवश्यक आहे.
