Skin Toner : नैसर्गिक स्किन टोनरनं चेहऱ्याचं सौंदर्य येईल खुलून, तेलकट किंवा कोरड्या त्वचेसाठीही उपयुक्त, जाणून घ्या कृती

Last Updated:

काही नेहमीचे जिन्नस वापरून तुम्ही घरी टोनर तयार करू शकता. ग्रीन टी, कोरफड, गुलाबपाणी, काकडीचा वापर करुन टोनर कसा तयार करायचा समजून घेऊया.

News18
News18
मुंबई : स्किन टोनर वापरत असाल तर इथे दिलेल्या टिप्स तुम्हाला नक्की उपयुक्त ठरतील. बऱ्याचदा बाजारात उपलब्ध असलेले टोनर वापरले जातात. या टोनरमुळे त्वचा हायड्रेटेड राहत असली तरी त्याची परिणामकारकता थोडावेळ टिकते. तसंत यातल्या रासायनिक घटकांमुळे, काही दुष्परिणाम होतात.
काही नेहमीचे जिन्नस वापरून तुम्ही घरी टोनर तयार करू शकता. ग्रीन टी, कोरफड, गुलाबपाणी, काकडीचा वापर करुन टोनर कसा तयार करायचा समजून घेऊया.
ग्रीन टी - बहुतेक घरांमधे ग्रीन टी उपलब्ध आहे. याचा वापर घरगुती टोनर बनवण्यासाठी देखील करू शकता. ग्रीन टी पाण्यात चांगलं उकळवा आणि थंड झाल्यावर स्प्रे बाटलीत ओता. आता हे पाणी चेहऱ्यावर शिंपडा, यामुळे त्वचा फ्रेश राहिल. या टोनरमुळे चेहऱ्यावरची छिद्र घट्ट राहतील. ग्रीन टीमधे भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे त्वचा चमकदार आणि हायड्रेट ठेवण्यास मदत होते.
advertisement
कोरफड - कोरफड त्वचेसाठी वरदान मानली जाते. कोरफड टोनर बनवण्यासाठी, अर्धा कप पाण्यात दोन चमचे कोरफड गर मिसळा. हे पाणी एका स्प्रे बाटलीत भरा, टोनर तयार आहे. हा टोनर चेहऱ्यावर लावल्यानं त्वचा हायड्रेट होते, मऊ आणि चमकदार राहते.
advertisement
गुलाबजल आणि काकडी - गुलाबजल आणि काकडी वापरून घरी टोनर देखील बनवू शकता. काकडी किसून घ्या आणि त्याचा रस काढा. नंतर, ते समान प्रमाणात गुलाबजलात मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत ओता. यामुळे चेहरा मॉइश्चरायझ होईल आणि कोरडेपणा दूर होईल.
लिंबू - घरी लिंबू टोनर बनवण्यासाठी, प्रथम अर्धा चमचा लिंबाचा रस एक ग्लास पाण्यात मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत ओता. ते लावल्यानं चेहरा खोलवर स्वच्छ होतो आणि उजळतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Toner : नैसर्गिक स्किन टोनरनं चेहऱ्याचं सौंदर्य येईल खुलून, तेलकट किंवा कोरड्या त्वचेसाठीही उपयुक्त, जाणून घ्या कृती
Next Article
advertisement
Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement