मुरमुरे आरोग्यासाठी चांगले मानले जातात. यापासून बनवलेला डोसादेखील खूप आरोग्यदायी असतो. रवा, बेसन आणि ताक यांचाही वापर मुरमुऱ्यापासून डोसा बनवण्यासाठी केला जातो. चला तर, मुरमुऱ्यापासून डोसा बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊ.
मुरमुरा डोसा बनवण्यासाठी साहित्य
मुरमुरे - 2 कप
रवा - अर्धा कप
ताक - 3/4 कप
गव्हाचं पीठ - 2 मोठे चमचे
advertisement
बेसन - 2 मोठे चमचे
चिरलेला कांदा - अर्धा
शिमला मिरची बारीक चिरून - 1
कोथिंबीर - 2 ते 3 चमचे
तिखट - 1/2 चमचा
चाट मसाला - 1/2 चमचा
काळं मीठ - 1/4 चमचा
किसलेलं चीज - 1/2 कप
बेकिंग सोडा - 1/4 चमचा
लिंबाचा रस - 1/2 चमचा
तेल - आवश्यकतेनुसार
मीठ – चवीनुसार
काजू-पनीरच्या भाजीत हा एक पदार्थ ठरतो महत्त्वाचा, ही पद्धत वापराल तर हॉटेलसारखी येईल चव!
असा करा मुरमुरा डोसा
मुरमुरा डोसा बनवण्यासाठी सर्वात प्रथम मुरमुरे स्वच्छ करा, व ते एका भांड्यात पाणी टाकून भिजत ठेवा. आता आणखी एका भांड्यात रवा घ्या, व त्यात ताक घालून मिक्स करा. दोन्ही भांडी 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवा. असं केल्यानं रवा व मुरमुरे फुगतात. यानंतर, मुरमुरे पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घ्या. आता भिजवलेला रवा, बेसनाचं पीठ, गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ घेऊन त्यात थोडेसं पाणी घाला, व त्याचं गुळगुळीत आणि मध्यम जाडीचं पीठ तयार होईपर्यंत मिश्रण करा. यानंतर, तयार केलेलं पीठ मिक्सरच्या भांड्यात घ्या, व ते कमीतकमी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मिक्सरमध्ये मिक्स करा. आता तयार केलेलं पीठ झाकून 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवा. जर पीठ खूप घट्ट झालं असेल, तर तुम्ही त्यात थोडं पाणी मिक्स करू शकता.
या नंतर पिठात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा. आता नॉनस्टिक पॅन घ्या, व गॅसवर ठेऊन गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं पाणी शिंपडा, आणि तो सुती कापडानं पुसून घ्या. यानंतर एका भांड्यात तयार केलेलं पीठ घेऊन ते तव्यावर डोसा घालतो तसं घाला व गोलाकार पसरवा. थोड्या वेळानंतर डोश्याच्या कडांना थोडं तेल लावा. डोश्याचा वरचा भाग कोरडा झाल्यानंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर आणि किसलेलं चीज टाका. यानंतर त्यावर तिखट, काळं मीठ आणि चाट मसाला टाका. आता गरमागरम डोसा सांबार आणि चटणीसोबत सर्व्ह करा.