काजू-पनीरच्या भाजीत हा एक पदार्थ ठरतो महत्त्वाचा, ही पद्धत वापराल तर हॉटेलसारखी येईल चव!
- Published by:Aaditi Datar
- trending desk
Last Updated:
आज आम्ही तुम्हाला काजू भाजी आणि ग्रेव्ही बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या भाजीमुळे तुमचं दुपारचं किंवा रात्रीचं जेवण नक्कीच खास होईल.
मुंबई, 27 सप्टेंबर : पनीरची भाजी सहसा एखाद्या विशेष कार्यक्रमासाठी तयार केली जाते. पनीर वापरून करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्या लोकप्रिय आहेत, त्यापैकीच एक भाजी म्हणजे काजू पनीर. काजू पनीरची भाजी खूप चविष्ट असते. अगदी लहान मुलांनाही या भाजीची चव आवडते. पण तुम्हाला माहिती आहे का, काजू पनीर भाजीची खरी चव ग्रेव्हीमध्ये असते. ग्रेव्हीमुळे या भाजीची चव अनेक पटींनी वाढते. जर तुम्हालाही चविष्ट काजू भाजी खायची असेल, तर त्यासाठी या भाजीची ग्रेव्ही योग्य प्रकारे तयार करणं महत्त्वाचं आहे.
आज आम्ही तुम्हाला काजू भाजी आणि ग्रेव्ही बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या भाजीमुळे तुमचं दुपारचं किंवा रात्रीचं जेवण नक्कीच खास होईल. जर तुम्ही काजू पनीर भाजी कधीच घरी करून पाहिली नसेल, तर आज आम्ही तुम्हाला ही भाजी बनवण्याची जी पद्धत सांगणार आहोत, ती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. चला तर, काजू पनीरच्या भाजीची ग्रेव्ही बनवण्याची रेसिपी जाणून घेऊ.
advertisement
काजू पनीर बनवण्यासाठी साहित्य
पनीरचे चौकोनी तुकडे - 1 कप
काजू – 2 ते 3 चमचे
बटर - 1 चमचा
कांदा बारीक चिरलेला – 1
टोमॅटो प्युरी – दीड कप
आले लसूण पेस्ट - 1 चमचा
advertisement
काजू पेस्ट - 2 चमचे
क्रीम/मलई - 2 चमचे
लवंगा – 2 ते 3
वेलदोडे - 2
जिरे - 1 चमचा
कढीपत्ता – 1 ते 2
हळद – 1/2 चमचे
लाल तिखट - 1 चमचा
धणे पावडर - 1 चमचा
गरम मसाला - 1/4 चमचा
जिरे पावडर - 1/4 चमचा
advertisement
कसुरी मेथी - 1 चमचा
हिरवी कोथिंबीर चिरलेली – 2 ते 3 चमचे
तेल - 2 चमचे
मीठ - चवीनुसार
अशी करा काजू पनीर
काजू पनीर भाजीची ग्रेव्ही या भाजीची चव खूप वाढवते. ही भाजी तयार करण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाका आणि ते गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात काजू घालून ते सोनेरी होईपर्यंत तळा. यानंतर तळलेले काजू एका प्लेटमध्ये काढा. त्याचप्रमाणे पनीर तळून बाजूला ठेवा. आता पॅनमध्ये एक चमचा बटर टाका आणि गरम करा. बटर वितळल्यानंतर त्यात कढीपत्ता, लवंगा, जिरं आणि वेलदोडा घालून परतवून घ्या. त्यानंतर कढईत बारीक चिरलेला कांदा आणि आले लसूण पेस्ट घालून ते परतवून घ्या. या वेळी गॅस कमी करा. त्यानंतर त्यात हळद, धणेपूड, तिखट, जिरेपूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्या, व या मिश्रणाला वाफ येऊ द्या. त्यातून सुगंध येईपर्यंत हे मिश्रण शिजवा.
advertisement
या नंतर पॅनमध्ये दीड कप टोमॅटो प्युरी घालून मिक्स करा. आता पॅन झाकून ठेवा आणि ग्रेव्हीला 10 मिनिटं शिजू द्या. या नंतर, झाकण काढून ग्रेव्हीमध्ये काजूची पेस्ट घाला, व ग्रेव्हीपासून तेल वेगळं होईपर्यंत ती शिजवा. यानंतर ग्रेव्हीमध्ये 2 चमचे क्रीम किंवा मलई घाला, व ती शिजू द्या. काही वेळाने ग्रेव्हीमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवा. ग्रेव्हीमध्ये तुम्हाला आवश्यक वाटतं, तेवढं पाणी घाला, व ती थोडी घट्ट होईपर्यंत शिजवा. आता तुमची काजू पनीर भाजीसाठी परफेक्ट ग्रेव्ही तयार होईल. या गेव्हीमध्ये तळलेले काजू आणि पनीर घालून चांगले मिसळा व सर्व्ह करा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पनीरचे चौकोनी तुकडे न तळता घालू शकता. काजू पनीरची भाजी तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी कधीही तयार करू शकता.
Location :
First Published :
September 27, 2023 11:13 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
काजू-पनीरच्या भाजीत हा एक पदार्थ ठरतो महत्त्वाचा, ही पद्धत वापराल तर हॉटेलसारखी येईल चव!