चमोली : न्यूझीलंडचं राष्ट्रीय फळ असलेलं कीवी जगभरात ‘सुपर फ्रूट’ म्हणून ओळखलं जातं. त्यामागे कारणही तसंच आहे. या फळाची किंमत इतर फळांच्या तुलनेत जास्त असते. साधारण 50 रुपयांना हे एक फळ मिळतं. शिवाय समुद्रतळापासून जवळपास 600 ते 800 मीटर उंचीवर या फळाचं उत्पादन घेतलं जातं. शिवाय हे फळ विविध औषधी गुणांनी परिपूर्ण असतं.
advertisement
आजारी व्यक्तीला डॉक्टर कीवी खाण्याचा सल्ला देतात. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे कीवीमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. शिवाय या फळामुळे पोटाचे विकार दूर होतात. प्रामुख्याने गॅसच्या समस्येवर आराम मिळतो. शिवाय शरिरातील रक्ताची आणि रक्तातील पेशींची कमतरता हे फळ भरून काढतं.
मशरूम फक्त चवीलाच नाही स्वादिष्ट; रक्तदाब ठेवतं नियंत्रणात, जीवनसत्त्वही असतात मुबलक!
विशेषतः डेंग्यूच्या रुग्णांना कीवी खाण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन बी, प्रोटीन, ऍसिड, सोडियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमसह या फळात अनेक गुणधर्म असतात. म्हणूनच या फळाला अँटीऑक्सिडंटचं पॉव्हर हाऊसदेखील म्हटलं जातं.
डायट कसलं करताय? 'हे' एक फळ खा, वजन होईल झटक्यात कमी!
दरम्यान, उत्तराखंडच्या डोंगराळ भागात आता हळूहळू शेतकरी बांधव कीवीचं उत्पादन घेऊ लागले आहेत. हे खोरं पूर्वी संत्र्याच्या उत्पादनासाठी विशेष ओळखलं जायचं. परंतु आता मात्र इथल्या वातावरणीय बदलांमुळे कीवीचं उत्पादन घेण्यास सुरुवात झाली आहे. चमोलीचे वनाधिकारी तेजपाल सिंह यांनी सांगितलं की, 2019 पासून याठिकाणी कीवी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात काम करण्यात आलंय. आता इथल्या 40 ते 41 हेक्टर जमिनीवर कीवीचं उत्पादन घेतलं जातं. त्याचबरोबर वनविभागाकडून मागील वर्षी शेतकऱ्यांना कीवीच्या 5000 रोपांचं वितरण करण्यात आलं, असं तेजपाल सिंह म्हणाले.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g