मशरूम फक्त चवीलाच नाही स्वादिष्ट; रक्तदाब ठेवतं नियंत्रणात, जीवनसत्त्वही असतात मुबलक!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
मशरूममध्ये एवढे पौष्टिक तत्त्व असतात की, त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून आपलं संरक्षण होऊ शकतं.
सोनिया मिश्रा, प्रतिनिधी
चमोली : मशरूम बाजारात प्रत्येक हंगामात मिळतात, परंतु हिवाळ्यात त्यांना विशेष मागणी असते. मशरूममधील पोषक तत्त्व आणि उबदारपणा हीच यामागची कारणं आहेत. महत्त्वाचं म्हणजे मशरूममध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, ज्यामुळे आरोग्य सुदृढ राहतं. शिवाय मशरूममध्ये पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि फायबरसारखे पोषक तत्त्वदेखील चांगल्या प्रमाणात असतात. म्हणूनच मशरूम विविध आजारांवर गुणकारी मानलं जातं.
advertisement
आयुर्वेदिक डॉक्टर प्रेरणा सांगतात की, मशरूममध्ये एवढे पौष्टिक तत्त्व असतात की, त्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून आपलं संरक्षण होऊ शकतं. त्याचबरोबर मशरूममधील अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे शरीर स्वच्छ होण्यासही मदत मिळते. शरिरात उबदेखील निर्माण होते.
दृष्टी होते तीक्ष्ण
डॉ. प्रेरणा सांगतात की, मशरूम जसे चवीला स्वादिष्ट असतात तसेच ते उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी फायदेशीरही ठरतात. त्यात सोडियम कमी आणि पोटॅशियम मुबलक असतं, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतं. शिवाय मशरूममध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत मिळते.
advertisement
मशरूमची साधारण किंमत काय?
सर्व बाजारपेठांमध्ये मशरूमची किंमत साधारणपणे 260 रुपये प्रति किलो इतकी असते. बाजारात मशरूम सहजपणे मिळतात. परंतु त्यांची खरेदी काळजीपूर्वक करावी. कारण खराब आणि चांगल्या मशरूममधला फरक सहज ओळखता येत नाही आणि खराब मशरूम खाल्ल्यास आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतात.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g
Location :
Chamoli,Uttarakhand
First Published :
January 05, 2024 9:40 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मशरूम फक्त चवीलाच नाही स्वादिष्ट; रक्तदाब ठेवतं नियंत्रणात, जीवनसत्त्वही असतात मुबलक!