डायट कसलं करताय? 'हे' एक फळ खा, वजन होईल झटक्यात कमी!

Last Updated:
आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्ती डायटिंग करतं. फॅट टू फिट होण्यावर सर्वांचा भर असतो, त्यामुळे जरा जरी वजन वाढलं तरी लगेच टेन्शन येतं. परंतु डायटिंगचा अर्थ अनेकजणांना व्यवस्थित माहित नसतो. डायटवर राहणं म्हणजे दिवस-दिवसभर उपाशी राहणं असं अनेकजणांना वाटतं, तर अनेकजणांना डायट करावं म्हणजे नेमकं काय खावं हेच कळत नाही. तर तज्ज्ञ डायटिंगमध्ये शरिराला पुरेसे पोषक तत्त्व मिळतील असे पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. अशाच एका पौष्टिक फळाबाबत आपण जाणून घेणार आहोत.
1/6
उत्तराखंड आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. शिवाय इथली फळं, फूलं आणि औषधी वनस्पतीदेखील विशेष प्रसिद्ध आहेत. इथलं 'नगदूण' नावाचं फळही लोकप्रिय आहे.

advertisement
2/6
नगदूण हे एक कंदमूळ आहे. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात, त्यामुळे ते शरिरासाठी फायदेशीर मानलं जातं. विशेष म्हणजे हे एक फळ खाल्ल्यावर पोट अगदी भरल्यासारखं वाटतं.

3/6
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात हिमालयाच्या पर्वतांवरील 6 हजार किमी उंच जागेत हे फळ मिळतं. स्थानिक लोक त्याला सुपर फूड म्हणतात. कारण ते खाल्ल्यावर जवळपास 8-9 तास भूक लागत नाही.

4/6
या फळात कार्बोहायड्रेट आणि फॅटसह अनेक पोषक तत्त्व असतात. परंतु तरीही हे फळ कच्च खाण्याचा सल्ला दिला जात नाही. डॉ. विजयकांत पुरोहित सांगतात, नगदूण कायम शिजवून खावं, हे फळ कच्च खाल्ल्यास तोंडात सूज येऊ शकते.

5/6
डॉ. विजयकांत पुरोहित हे उच्च शिखरीय पादप शोध केंद्राचे डायरेक्टर आहेत. नगदूणवर सध्या संशोधन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी हिमालयाच्या उंच भागातून आणून या फळाची लागवड नर्सरीत करण्यात आली आहे. इथं व्यवस्थित राहिल्यास त्याची शेती करणं सोपं होईल, असं डॉक्टर सांगतात.

6/6
लक्षात घ्या, फळं आणि भाज्या आरोग्यासाठी कितीही फायदेशीर असल्या तरी त्यांचा औषध म्हणून वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण एखाद्या विशिष्ट पदार्थाचं किती प्रमाणात सेवन करावं हे व्यक्तीच्या वय आणि वजनावर अवलंबून असतं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement