TRENDING:

अंधश्रद्धेतून वाढतोय गंभीर मानसिक आजार, जाणून घ्या लक्षणं आणि करा संरक्षण

Last Updated:

हा एक असा आजार आहे ज्यात व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचाच विसर पडतो. त्याच्या आयुष्यात कोणताही आनंद किंवा दुःख उरत नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कमल पिमोली, प्रतिनिधी
व्यक्तीला वयाच्या 20 ते 40 वर्षांपर्यंत या आजाराची पहिली स्टेज जाणवू लागते.
व्यक्तीला वयाच्या 20 ते 40 वर्षांपर्यंत या आजाराची पहिली स्टेज जाणवू लागते.
advertisement

श्रीनगर गढवाल : शरिरासह मनाचीही काळजी घ्यायला हवी, आपलं मनही जपायला हवं, असं तज्ज्ञ वारंवार सांगतात. कारण मानसिक आजार ओळखणं सोपं नसतं. त्यामुळे त्यावर लवकर उपचारही करता येत नाहीत. अनेकजण मानसिक आजार बरा करण्याच्या नादात अंधश्रद्धेच्या आहारी जातात. त्यामुळे तो बरा होत नाही, तर आणखी बिघडतो. विशेषतः 'सीजोफ्रेनिया' या आजारावर उपचार करण्यासाठी लोक अंधश्रद्धेचा आधार घेतात. अंधश्रद्धेच्या उपायांमधूनच हा आजार आणखी बळावत असल्याचं आढळून आलंय.

advertisement

सीजोफ्रेनिया हा एक असा आजार आहे ज्यात व्यक्तीला स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचाच विसर पडतो. त्याच्या आयुष्यात कोणताही आनंद किंवा दुःख उरत नाही. त्याच्या मनात सतत स्वतःविरोधात केवळ शंका आणि भीती असते. अशी लक्षणं दिसल्यास ताबडतोब मानसोपचारतज्ज्ञांची भेट घ्यावी.

डायट कसलं करताय? 'हे' एक फळ खा, वजन होईल झटक्यात कमी!

डॉक्टर मोहित सैनी सांगतात, सीजोफ्रेनिया आजारात व्यक्ती सतत कुठेना कुठे मनाने हरवलेली असते, ती स्वतःशीच गप्पा मारते, परंतु तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नसतात. ती दिवस-दिवसभर झोपूनच राहते. तिला इतर कोणी काही बोलल्यास पटक राग येतो. शिवाय काहीच कारण नसताना ती हसत राहते, त्यामुळे ती इतरांसाठी हास्याचा विषय ठरते. परंतु म्हणूनच इतर सर्वजण आपल्याविरोधात कट रचताहेत अशी भावना तिच्या मनात व्यक्त होते. महत्त्वाचं म्हणजे तिला वेगवेगळे आवाज ऐकू येतात. त्याचबरोबर तिच्या मनात नको नको त्या शंका येतात, तिला वेगवेगळे भास होतात. एकूणच सीजोफ्रेनिया हा एक गंभीर आजार आहे.

advertisement

मशरूम फक्त चवीलाच नाही स्वादिष्ट; रक्तदाब ठेवतं नियंत्रणात, जीवनसत्त्वही असतात मुबलक!

खरंतर हा आहे बायोलॉजिकल डिसऑर्डर!

अनेकजणांना वाटतं की, सीजोफ्रेनिया तणावातून होतो. परंतु असं नाहीये, तर हा आजार अनुवंशिक आहे. कुटुंबात आधी कोणाला सीजोफ्रेनिया असल्यास व्यक्तीला वयाच्या 20 ते 40 वर्षांपर्यंत या आजाराची पहिली स्टेज जाणवू लागते. निद्रानाश आणि अति चिडचिड ही सुरुवातीची लक्षणं असतात.

advertisement

नेमकी काय काळजी घ्यावी?

  • या रुग्णांना कधीच एकटं सोडू नये.
  • त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा माराव्या, त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे जाणून घ्यावं.
  • रुग्णाला कायम कामात व्यस्त ठेवावं. शांत बसल्यास त्यांच्या मनात विचारांची कालवाकालव सुरू होते.
  • रुग्णाच्या मनात कोणत्याही प्रकारची हीन भावना येऊ देऊ नये. त्यांना सतत ते किती छान आहेत हे सांगावं.
  • advertisement

  • योगसाधना केल्यास त्यांचं मन तणावमुक्त राहतं.

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
अंधश्रद्धेतून वाढतोय गंभीर मानसिक आजार, जाणून घ्या लक्षणं आणि करा संरक्षण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल