धूम्रपान न करताही होतोय फुफ्फुसांचा कर्करोग
भारतामध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. मुळातच्या ज्या व्यक्ती अती धुम्रपान करतात त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग होत असतो मात्र आता प्रदूषणामुळे धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये कर्करोग आढळून आलाय. त्यामुळे नागरीकांना आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.
'Heart Attack In Winter हिवाळ्यात का वाढतात हार्ट ॲटॅक? अशी घ्या हृदयाची विशेष काळजी'
advertisement
वायू प्रदूषणात वाढ झाल्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता असते असं तज्ज्ञ सांगतात. कारण प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या ऊतींचे नुकसान होऊन कर्करोगाचा धोका वाढतो. भारतासह इतर ठिकाणी धूम्रपान न करणाऱ्या लोकांना फुफ्फुसांच्या कर्करोगाची लागण झाली आहे. हा आजार भारतामध्ये मागील १० वर्षांपासून दिसून येत आहे. याला ‘एडेनोकार्सिनोमा’ असं म्हणतात. फुफ्फुसांचा कर्करोग यासाठी धोकादायक मानला जातो की, त्याची सुरूवात झाल्यानंतरही आधी कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र कालांतराने या आजाराची लक्षणे दिसू लागतात.
'सावधान! तुमचा मेंदू म्हातारा होतोय ? आत्ताच बदला ‘या’ चुकीच्या सवयी,अन्यथा येईल पश्चातापाची पाळी'
अस्थमा आणि ऍलर्जीसारख्या आजारांची लागण झालेल्या रुग्णांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची शक्यता असते. फुफ्फुसांचा कर्करोग होऊ नये म्हणून तज्ज्ञांनी N95 मास्क घालण्याचा सल्ला दिलाय. जेणेकरून या आजाराला वेळीच प्रतिबंध करता येऊ शकेल. कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारात अँटिऑक्सिडंट्स समृद्ध पदार्थांचा वापर करण्याचा आणि सतत पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.