जाणून घेऊयात तणाव कमी करण्याच्या काही सोप्या टिप्स्
दीर्घ श्वास घ्या : जेव्हा जेव्हा तुम्हाला तणाव जाणवत असेल तेव्हा दीर्घ श्वास घ्या. हळू हळू श्वासोच्छवास केल्याने शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, जो तणाव कमी करण्यास मदत करतो. दीर्घ श्वासामुळे मन आणि शरीर दोन्हीही व्हायला मदत होते. तुम्हाला फारच जास्त तणाव असेल तर तो कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान हे सर्वात प्रभावी मार्ग आहेत. या दोन्हीमुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉलचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे तणाव कमी होतो.
advertisement
चांगली झोप : तणावमुक्त आयुष्यासाठी चांगली झोप फायद्याची ठरते. चांगली झोप घेतल्याने मन आनंदी राहून तणाव कमी होण्यासही मदत होते. जर तुमची झोप अपुरी असेल किंवा तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर तुम्हाला तणाव आणि विविध शारीरिक व्याधींचा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे रात्री किमान 7 ते 8 तासांची शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा.
व्यायाम : धावणे, पोहणे, सायकल चालवणे किंवा हलका व्यायाम केल्याने देखील तणाव कमी व्हायला मदत होऊ शकते. शारीरिक हालचालींमुळे शरीरात एंडॉर्फिन म्हणजे आनंदी हार्मोनचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे मन आनंदी राहून तणाव कमी होतो.
पोषक आहार : ऐकून आश्चर्य वाटेल पण तणाव कमी करण्यासाठी चांगला पोषक आहार हा अत्यावश्यक ठरतो. कारण सकस आहारातून शरीराला विविध पोषक तत्त्वं मिळतात. ज्याचा फायदा फक्त शरीरालाच नाही तर मानसिक आरोग्यासाठीसुद्धा होतो. त्यामुळे तुम्हाला ताण कमी करायचा असेल तर फळं, पालेभाज्या खा. शरीर हायड्रेटट राखण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी प्या. जंक फूड टाळा. ज्यामुळे तुमच्या शरीरातल्या ऊर्जेची पातळी स्थिर राहण्यास मदत होईल.
संगीत : गाणी ऐकल्याने तुमचा मूड सुधारू शकतो आणि तणाव कमी होऊ शकतो. मात्र तुम्ही योग्यवेळी योग्य प्रकारची गाणी ऐकायला हवीत. शांत म्युझिक ऐकल्याने तुमचा तणाव कमी होत असल्याचं अनेक प्रयोगांवरून सिद्ध झालंय.
संवाद : असं म्हटलं जातं की आपलं दु:ख कोणाला सांगितल्याने ते हलकं व्हायला मदत होते. मानसिक ताणाचंही तसंच आहे. जर तुम्ही तणावात असाल तर तुमचा जवळतचा मित्र, मैत्रिण किंवा समुपदेशकाशी बोला. याने तुमचं मन हलकं होईल आणि ताण कमी व्हायला मदत होईल.