Weekend Workout Benefits: रोज व्यायाम करता येत नाही; काळजी नको विकेंडला करा ‘हे’ व्यायाम, राहाल फिट
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Weekend Workout Benefits: आज आम्ही तुम्हाला व्यायामाचे असे काही प्रकार सांगणार आहोत जे तुम्ही सुट्टीच्या दिवशी आणि आठवड्यातून फक्त एकदा करू शकता. एकदा व्यायाम केल्यामुळे तुमचं शरीर फिट आणि स्वस्थ राहायला मदत होऊ शकेल.शिवाय आठवडाभर व्यायाम केल्याने तुम्हाला जे फायदे मिळतील तेच फायदे तुम्ही आठवड्यातून एकदा व्यायाम केल्याने होतील.
मुंबई: सध्याच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. काहींना सकाळी लवकर कामावर जावं लागतं, तर काहींना कामावरून परतण्यास उशीर होतो. ऑफिसच्या त्रासामध्ये, विविध कारणांमुळे तणावच इतका वाढलाय की अनेकांना वेळेवर जेवणं शक्य होत नाही. अशा स्थितीत व्यायामासाठी वेळ कसा काढायचा असा प्रश्न या व्यक्तींना पडतो. काही जण यातूनही मार्ग काढून जीमला जातात, मात्र पुन्हा काही कारणांमुळे जीम अर्धवट राहिल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम दिसून येतात. मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही व्यायामाचे प्रकार सांगणार आहोत जे तुम्ही सुट्टीच्या दिवशी आणि आठवड्यातून फक्त एकदा करू शकता. एकदा व्यायाम केल्यामुळे शरीराला फिट आणि स्वस्थ राहायला मदत होऊ शकेल.
नेमका हा कोणता व्यायाम?
सुट्टीच्या एका दिवसात काही मिनिटांसाठी हा व्यायाम केल्याने ते शरीरासाठी फायद्याचं ठरू शकतं. सुट्टीच्या दिवशी केला जाणारा व्यायाम म्हणून याला वीकेंड वर्कआऊट असं म्हणता येऊ शकतं. आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की, जीममध्ये न जाता फिट कसं राहता येऊ शकतं किंवा आठवड्यातून फक्त एक दिवस व्यायाम केल्याने कसा फायदा होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून असं समोर आलं आहे की, जर तुम्ही फक्त वीकेंडलाच व्यायाम केला तरीही तुमच्या शरीराला आणि मेंदूला नियमित व्यायामासारखेच फायदे मिळतात.
advertisement
जाणून घेऊयात या विकेंड वर्कआऊट विषयी.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आले आहे की, वीकेंडला व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याला नियमित व्यायामासारखेच फायदे मिळतात. दोन्ही वर्कआउट्सचा मेंदूवर समान परिणाम होतो. गेल्या काही अभ्यासांमध्ये असं आढळून आलं होतं की, व्यायामामुळे मेंदूचं आरोग्य सुधारायला मदत होते. ज्या व्यक्ती नियमितपणे व्यायाम करतात किंवा जे वृध्द स्वत:ला फिट ठेवण्यासाठी साधे सोपे व्यायाम करतात, त्यांना स्मृतिभ्रंश आजाराचा धोका कमी होतो. नुकतंच 10 हजारांपेक्षा अधिक लोकांवर केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, अजिबातच व्यायाम न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत वींकेडला व्यायाम करणाऱ्या व्यक्तींचा मेंदू स्वस्थ राहतो आणि त्यांनासुद्धा दररोज व्यायाम करणाऱ्या व्यक्तीं इतकाच फायदा मिळून सौम्य डिमेंशिया होण्याचा धोका कमी होतो.
advertisement
या अभ्यासाच्या प्रमुख लेखक डॉ. गॅरी ओ डोनोव्हन म्हणतात की, ‘आठवड्यातून एक किंवा दोनदा व्यायाम करण्याचे फायदे हे जवळपास नियमित व्यायामासारखेच आहेत. आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना होणारे फायदे आता संशोधनाचा एक चांगला विषय बनलाया. ज्या व्यक्ती नियमितपणे व्यायाम करतात त्यापेक्षा ते सुट्टीच्या दिवशी जास्त व्यायाम करतात, जो त्यांचा शरीरासाठी आणि मेंदूसाठी फायद्याचा ठरतो. यामुळे मानसिक आरोग्यातही सुधारणा दिसून येते.
advertisement
अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये या संदर्भात आणखी एक अभ्यास करण्यात आलाय. ज्यात असं दिसून आलं की, जे लोक आठवड्यातून फक्त 1 किंवा 2 दिवस व्यायाम करतात त्यांना अजिबात व्यायाम न कराणाऱ्यांच्या तुलनेत 200 पेक्षा जास्त आजारांचा धोका कमी असतो. जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांनाही हे फायदे मिळतात.त्यामुळे अधूनमधून व्यायाम हा शरीरासोबत मेंदूसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
तुम्ही जर रोज व्यायाम करत असाल तर तो तुमच्या फायद्याच आहे. मात्र तुम्हाला रोज व्यायाम करता येत नसेल तर तुम्ही सुट्टीच्या दिवशी व्यायाम केल्यानेसुद्धा फिट राहू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 28, 2024 3:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weekend Workout Benefits: रोज व्यायाम करता येत नाही; काळजी नको विकेंडला करा ‘हे’ व्यायाम, राहाल फिट