जास्त वेळ वापरल्यानं दातांवरचं इनॅमल खराब होऊ शकतं. योगगुरू आणि लेखिका डॉ. हंसा योगेंद्र यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत, योगगुरूंनी हळदीनं तुम्ही नैसर्गिकरित्या दात कसे स्वच्छ आणि पांढरे करू शकता याची माहिती दिली आहे. हळद नैसर्गिक असल्यानं त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
Nail Care : अस्वच्छ नखं दिसतील चकचकीत, या उपायांनी नखं होतील खोलवर स्वच्छ
advertisement
हळदीत आढळणारं कर्क्यूमिन हा घटक शक्तिशाली बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारा तसंच दाहक-विरोधी संयुग आहे. यामुळे तोंडातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत होते आणि दात आणि हिरड्या निरोगी राहतात.
हळदीमुळे दात स्वच्छ होतात तसंच दात किडणं, हिरड्या सुजणं आणि तोंडाची दुर्गंधी यासारख्या समस्यांचं प्रमाणही कमी होतं.
हळदीच्या पेस्टनं ब्रश करणं - यासाठी अर्धा चमचा हळद पावडर घ्या आणि त्यात काही थेंब पाणी घाला जेणेकरून त्याची जाड पेस्ट तयार होईल. आता, ही पेस्ट टूथब्रशला लावा आणि एक मिनिटासाठी हलक्या हातानं दात घासा. नंतर, पाण्यानं तोंड पूर्णपणे स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोन-तीन वेळा हा उपाय करा. हळूहळू, दातांवरील डाग नाहीसे होऊ लागतील आणि त्यांचा नैसर्गिक शुभ्रपणा परत येईल.
Digestion : थंडीच्या दिवसात खा या भाज्या, आतड्यांचं काम होईल सुलभ
दुसरी पद्धत म्हणजे हळद आणि नारळ तेलाचं मिश्रण. दोन्हीमधे बॅक्टेरियाच्या वाढीला प्रतिबंध करणारे गुणधर्म आहेत आणि ते तोंडाला विषमुक्त करण्यास मदत करतात.
अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा नारळ तेलात मिसळा. आता, हे मिश्रण तोंडात पाच-दहा मिनिटं फिरवा. यानंतर, ते थुंकून स्वच्छ पाण्यानं तोंड धुवा. नारळाच्या तेलातील लॉरिक एसिड तोंडातील बॅक्टेरिया कमी करतं, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी आणि संसर्ग दोन्हीपासून आराम मिळतो.
