Digestion : आहार योग्य असेल तर आतडी राहतील चांगली, आतड्यांच्या स्वच्छतेसाठी या टिप्स महत्त्वाच्या

Last Updated:

आतडी स्वच्छ केल्यानं शरीर सक्रिय राहतं आणि थकवा सारख्या समस्या दूर होतात. डॉ. सौरभ सेठी यांनी निरोगी आतड्यांसाठी पाच भाज्यांची यादी केली आहे. त्या खाल्ल्यानं शरीर ऊर्जावान राहील आणि आतडी स्वच्छ होतील.

News18
News18
मुंबई : पाऊस, ऊन आणि आता थंडी...बदलत्या ऋतूंसोबत, आहारापासून जीवनशैलीपर्यंत सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण बदलत्या हवामानासोबत अनेक आजारांचा धोका वाढतो. हिवाळा आता सुरू होईल, त्याआधी या टिप्स नक्की वाचा.
हिवाळ्यात पाणी कमी प्यायलं जातं आणि खाण्याच्या सवयी देखील पूर्णपणे बदलतात. रोजच्या थकव्यामुळे शरीर जड वाटतं, त्वचा निस्तेज दिसते आणि पचनसंस्था नीट काम करत नाही आणि त्यात वातावरणात बदल झाले की त्याचा परिणाम जाणवतो.
प्रकृतीसाठी, व्हिटॅमिनसाठीच्या गोळ्या, प्रोटीन पावडर किंवा विविध प्रकारच्या डिटॉक्स ड्रिंक्स घेतली जातात, पण या सर्वांमुळे काही फरक पडत नाही.
advertisement
यासंदर्भात, डॉ. सौरभ सेठी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण आपली जीवनशैली आणि आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. शरीर ऊर्जावान राहण्यासाठी, आपण मूळ कारणाकडे लक्ष दिले पाहिजे, ते म्हणजे आतड्यांचे आरोग्य.
आतडी स्वच्छ केल्यानं शरीर सक्रिय राहतं आणि थकवा सारख्या समस्या दूर होतात. डॉ. सौरभ सेठी यांनी निरोगी आतड्यांसाठी पाच भाज्यांची यादी केली आहे. त्या खाल्ल्यानं शरीर ऊर्जावान राहील आणि आतडी स्वच्छ होतील.
advertisement
बीट - बीटामधे बीटेन आणि नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि यकृताचं कार्य चांगलं होतं. बीटामुळे पचन सुधारतं, शरीर ताजंतवानं राहतं आणि त्वचा निरोगी दिसते.
पालेभाज्या - पालक, मेथी यासारख्या हिरव्या भाज्यांमधे मॅग्नेशियम, फोलेट आणि प्रीबायोटिक फायबर भरपूर प्रमाणात असतं. हे पोषक घटक आतड्यांतील बॅक्टेरियाचे निरोगी संतुलन राखण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी मदत करतात. हिरव्या पालेभाज्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे.
advertisement
गाजर - गाजरात बीटा-कॅरोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. गाजरांमधे कॅरोटीनॉइड्स असतात, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होतात, डोळे निरोगी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.
रताळं - रताळ्यांमधील नैसर्गिक गोडवा आणि फायबरमुळे पचन सुधारतं आणि पोट हलकं राहतं. आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना देखील यामुळे पोषण मिळतं, ज्यामुळे आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं.
advertisement
कारलं - कारल्यामुळे चयापचय सुधारतं आणि शरीरातील जळजळ कमी होते. कारला यकृताच्या पेशींच्या पुनरुत्पादनासाठी चांगलं आहे, तर फुलकोबी पचनसंस्थेतील फायदेशीर एंजाइम सक्रिय करते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Digestion : आहार योग्य असेल तर आतडी राहतील चांगली, आतड्यांच्या स्वच्छतेसाठी या टिप्स महत्त्वाच्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement