advertisement

Health Tips : हा काढा करेल अशक्तपणा - थकवा गायब, शरीराला मिळेल ताकद, वाचा सविस्तर

Last Updated:

बहुतेकदा मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स आणि सिरपचा पर्याय निवडला जातो. पण या गोळ्यांमुळे शरीराला मिळणारी पुरेशी ताकद मिळत नाही. या गोळ्यांमुळे शरीराची ऊर्जा तात्पुरती वाढते. म्हणून, महागड्या गोळ्या न घेता थकवा आणि अशक्तपणा कमी करायचा असेल, तर एक काढा तुम्हाला चांगली ऊर्जा देऊ शकतो.

News18
News18
मुंबई : अशक्तपणा आणि थकवा जाणवत असेल तर बहुतेकदा मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स आणि सिरपचा पर्याय निवडला जातो. पण या गोळ्यांमुळे शरीराला मिळणारी पुरेशी ताकद मिळत नाही. या गोळ्यांमुळे शरीराची ऊर्जा तात्पुरती वाढते. म्हणून, महागड्या गोळ्या न घेता थकवा आणि अशक्तपणा कमी करायचा असेल, तर एक काढा तुम्हाला चांगली ऊर्जा देऊ शकतो.
ऊर्जा वाढवण्यासाठी नैसर्गिक काढ्याबद्दलचा एक व्हिडिओ आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. हा खास तयार केलेला आयुर्वेदिक काढा पिणं अत्यंत फायदेशीर ठरू शकतं.
काढा बनवण्यासाठी साहित्य - शेवग्याच्या शेंगा, अश्वगंधा आणि दालचिनी. हा काढा तयार करणं अगदी सोपं आहे. यासाठी, एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात एक चमचा शेवग्याच्या शेंगांची पावडर, अर्धा चमचा अश्वगंधा पावडर आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर घाला. हे मिश्रण सुमारे दहा मिनिटं उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर ते गाळून घ्या आणि कोमट प्या. गोडपणासाठी तुम्ही मध किंवा गूळ देखील घालू शकता.
advertisement
बहुतेकांसाठी, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा काढा घेणं पुरेसं आहे. पण, ज्यांना तीव्र अशक्तपणा आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज काढा प्यावा.
सकाळी नाश्त्यानंतर किंवा संध्याकाळी पाच-सहाच्या सुमारास काढा पिणं चांगलं. या वेळी ते पिऊ शकत नसाल तर रात्री झोपण्यापूर्वी देखील काढा पिऊ शकता.
तुम्हाला उच्च रक्तदाब, थायरॉईड किंवा हृदयरोगाचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काढा घ्या. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी देखील हा काढा पिणं टाळावं.
advertisement
शेवग्याच्या शेंगा नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिन म्हणून काम करतात. त्यात कॅल्शियम, लोह, प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे आवश्यक पोषक घटक असतात. शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी या घटकांची मदत होते.
अश्वगंधामुळे मज्जासंस्थेला आराम मिळतो. तणाव संप्रेरकांना देखील संतुलित करण्याचं काम यामुळे होतं. दालचिनीमुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि साखरेची पातळी राखली जाते.
advertisement
या आयुर्वेदिक काढ्याव्यतिरिक्त, जर तुम्हाला त्वरित उर्जेची आवश्यकता असेल तर तुम्ही काही ऊर्जा वाढवणारे पदार्थ खाऊ शकता. अशक्तपणा दूर करण्यासाठी आंबा, मध, रताळं, बदाम आणि अक्रोड हे पदार्थ डॉक्टरांनी सुचवले आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Health Tips : हा काढा करेल अशक्तपणा - थकवा गायब, शरीराला मिळेल ताकद, वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement