TRENDING:

Travel Without Money : फिरत राहा, कमवत राहा! स्वतःचे पैसे खर्च न करताही करू शकाल प्रवास; पाहा कसा..

Last Updated:

How to travel for free : सोशल मीडिया उघडताच कुणी डोंगरात बसून लॅपटॉपवर काम करताना दिसतं, तर कुणी समुद्रकिनारी कॉफी पीत व्हिडीओ शूट करत असतं. इथूनच मनात प्रश्न उभा राहतो. खरंच पैशांशिवाय प्रवास करता येतो का?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजच्या काळात प्रत्येक दुसरा माणूस प्रवास करू इच्छितो. नवी शहरं पाहणं, नव्या ठिकाणचं अन्न चाखणं, वेगवेगळ्या लोकांना भेटणं आणि रोजच्या बांधील आयुष्यातून थोडं बाहेर पडणं आता स्वप्न राहिलेलं नाही. सोशल मीडिया उघडताच कुणी डोंगरात बसून लॅपटॉपवर काम करताना दिसतं, तर कुणी समुद्रकिनारी कॉफी पीत व्हिडीओ शूट करत असतं. इथूनच मनात प्रश्न उभा राहतो. खरंच पैशांशिवाय प्रवास करता येतो का? या प्रश्नाचं उत्तर एका ओळीत देणं सोपं नाही.
प्रवास करताना पैसे कसे कमवावे?
प्रवास करताना पैसे कसे कमवावे?
advertisement

प्रवास कधीच पूर्णपणे मोफत नसतो. पण हो, असा मार्ग नक्कीच आहे, जिथे तुम्ही फिरत-फिरत स्वतःचा खर्च काढू शकता. आज असे अनेक लोक आहेत ज्यांनी नोकरी सोडली, एका ठिकाणी स्थिर राहण्याची कल्पना बदलली आणि प्रवासालाच कमाईचं साधन बनवलं. त्यांच्यासाठी प्रवास हा फक्त छंद नाही, तर काम आहे. या लोकांनी फिरणं थांबवलं, तर त्यांची कमाईही थांबते.

advertisement

खरा फरक विचारसरणीत आहे. तुम्ही प्रवासाला सुट्टीसारखं पाहता की लाईफस्टाइलसारखं, यावरच ठरतं की तुमचा खर्च वाढेल की तुम्ही तो सांभाळू शकाल. या लेखात आपण त्या रिअल मार्गाबद्दल बोलणार आहोत, जिथे प्रवास फक्त खर्च न राहता कमाईची संधी बनू शकतो. या हवेतल्या गोष्टी नाहीत, तर अगदी प्रॅक्टिकल पद्धतीने तुम्ही खरंच असे करू शकता.

advertisement

तुम्हाला टुरिस्ट व्हायचंय की ट्रॅव्हलर?

- सर्वात आधी स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. तुम्हाला टुरिस्ट व्हायचंय की ट्रॅव्हलर?

- टुरिस्ट म्हणजे ज्याला सगळं आरामात हवं असतं. चांगली हॉटेल, ठरावीक वेळेची गाडी, प्रसिद्ध ठिकाणांची यादी आणि कुठलाही त्रास न होता फिरणं. यात मजा खूप असते, पण खर्चही तितकाच जास्त असतो.

- ट्रॅव्हलरची विचारसरणी वेगळी असते. त्याला फक्त आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचं असतं. बसने जाऊ दे, लिफ्ट घेऊन जाऊ दे किंवा पायी जाऊ दे. ट्रॅव्हलरला आव्हानांची भीती वाटत नाही, उलट तीच त्याची खरी कमाई असते. वाटेत येणाऱ्या अडचणी त्याला नवे उपाय शोधायला शिकवतात आणि हेच पुढे कामी येतं.

advertisement

- जर तुमचा उद्देश कमी बजेटमध्ये दीर्घकाळ फिरण्याचा असेल, तर टुरिस्टसारखी मानसिकता सोडावी लागेल.

रिमोट जॉब : प्रवासासोबतचा सर्वात सुरक्षित मार्ग

- प्रवास करताना आरामात खर्च काढायचा असेल, तर रिमोट जॉब हा सर्वात सोपा मार्ग आहे. आज अनेक कंपन्या लोकेशनपेक्षा काम पाहतात. लॅपटॉप आणि इंटरनेट असेल तर तुम्ही कुठूनही काम करू शकता.

advertisement

- कंटेंट रायटिंग, ग्राफिक डिझाइन, सोशल मीडिया मॅनेजमेंट, कस्टमर सपोर्ट, डेटा अ‍ॅनालिसिस अशा अनेक नोकऱ्या आहेत, ज्या प्रवासासोबत करता येतात. अनेक ट्रॅव्हलर्स सकाळी डोंगरात काम करतात आणि संध्याकाळी आजूबाजूला फिरतात.

स्किल शिका आणि फ्रीलान्सिंग सुरू करा

- तुमच्याकडे आधीपासून रिमोट जॉब नसेल तर घाबरण्याची गरज नाही. तुम्ही एखाद्या स्किलवर काम सुरू करू शकता. सुरुवातीला थोडा वेळ लागेल, पण पहिली कमाई होताच मार्ग स्पष्ट होतो.

- एक रिअल उदाहरण पाहा. अनेक जण आपल्या शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात फ्रीलान्सिंग सुरू करतात. जसं कुणी रिमोट सेन्सिंग, आयटी, डिझाइन किंवा मार्केटिंग शिकलं असेल तर त्या क्षेत्रातील प्रोजेक्ट्स घ्यायला लागतात. जसजशी कमाई वाढते, तसतसा प्रवासही सुरू होतो.

कंटेंट क्रिएशन : दिसायला सोपं, पण थोडं रिस्की

- आजकाल अनेकांना वाटतं की, व्हिडीओ बनवा, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर टाका आणि पैसे यायला लागतील. खरं म्हणजे कंटेंट क्रिएशनमध्ये मजा खूप आहे, पण त्याहून जास्त संयम लागतो.

- चॅनल कधी मोनेटाइज होईल याची काहीच खात्री नसते. कुणाला एक वर्ष लागतो, कुणाला तीन वर्षं. आणि मोनेटाइज झाल्यावरही तुमची कमाई प्रवासाचा खर्च भागवेलच असं नाही.

- म्हणूनच अनेक अनुभवी ट्रॅव्हलर्स कंटेंट क्रिएशनसोबत फ्रीलान्सिंगही करतात, जेणेकरून एक आधार तयार राहतो.

स्वतःचे चॅनलच नाही, इतरही मार्ग आहेत..

कंटेंट क्रिएशन म्हणजे तुम्हालाच स्वतःचे चॅनल सुरू करावे लागेल असं नाही. तुम्ही ट्रॅव्हल कंपन्या, ब्लॉग्स किंवा यूट्यूब चॅनल्ससाठी कंटेंट तयार करू शकता. ब्लॉग लिहिणं, व्हिडीओ एडिट करणं, स्क्रिप्ट तयार करणं. ही सगळी कामंही पैसे देऊ शकतात. इंस्टाग्रामवर लाखो व्ह्यूज असूनही कमाई खूप कमी असू शकते, तर यूट्यूबमध्ये ब्रँड कोलॅब्स आणि ऑडियन्स फंडिंगसारखे पर्याय मिळतात.

वॉलंटियरिंग आणि होमस्टेचा आधार

जर खर्च आणखी कमी करायचा असेल, तर वॉलंटियरिंग हा चांगला मार्ग आहे. अनेक होमस्टे आणि कंपन्या अशा असतात, जिथे तुम्हाला त्यांच्या कामात मदत करावी लागते आणि बदल्यात मोफत जेवण आणि राहण्याची सोय मिळते. कुठे किचनचं काम, कुठे गेस्ट हँडलिंग, कुठे गाईडची मदत.. काम वेगवेगळं असू शकतं. यामुळे राहण्याचा खर्च जवळपास संपतो.

सगळ्यांसाठी एकच मार्ग नसतो

अ‍ॅफिलिएट मार्केटिंग, ट्रेडिंग, हिचहायकिंग असे आणखीही पर्याय आहेत, पण प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी योग्य नसते. हिचहायकिंगमध्ये जोखीम जास्त असते आणि दीर्घकाळ त्यावर भरोसा ठेवता येत नाही.

शेवटी मुद्दा तिथेच येऊन थांबतो. तुमच्याकडे कोणती स्किल आहे आणि ती तुम्ही प्रवासासोबत कशी वापरू शकता. फिरणंही मेहनत मागतं आणि अनेकदा खूप थकवणारं असतं, म्हणून निर्णय विचारपूर्वक घेणं गरजेचं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात महागलेला शेवगा आता जागेवर आला, डाळिंबाचीही आवक वाढली, दर किती?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Travel Without Money : फिरत राहा, कमवत राहा! स्वतःचे पैसे खर्च न करताही करू शकाल प्रवास; पाहा कसा..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल