मुंबई : एकट्याने दुचाकीवरून मुंबई - लंडन - मुंबई असा प्रवास करणारा नवी मुंबईचा तरुण योगेश अलेकरी पहिला भारतीय ठरला आहे. त्याने 136 दिवसांमध्ये दुचाकीवरून लंडनचा परतीचा प्रवास केला. योगेशने 27 देश, आशिया आणि युरोप खंडातून प्रवास करून विक्रम केला आहे. या प्रवासात त्याने 'सुरक्षित प्रवास व रस्ता सुरक्षा' आणि 'वसुधैव कुटुंबकम्' या दोन संदेशांचा प्रसार करून तो हजारो लोकांपर्यंत पोहचला.
advertisement
रस्ते सुरक्षेचा संदेश
नवी मुंबईतील रहिवासी योगेश अलेकरी याने 27 जुलै रोजी मुंबई सेंट्रल येथील राज्य परिवहन विभागातून मुंबई-लंडन प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने 16 सप्टेंबर रोजी लंडन गाठले. लंडन येथील भारतीय दुतावासाला भेट दिली. त्यावेळी गणेशोत्सव सुरू होता. या उत्सवात रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच ब्रायटन समुद्रकिनाऱ्यालाही त्याने भेट दिली. ठिकठिकाणी जाऊन त्याने रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती केली.
अर्धांगवायूनं गाठलं पण हार नाही मानली, ज्योती मावशींच्या हाताची चवच न्यारी
म्हणून मार्ग बदलला
हमास आणि इस्राएलमधील युद्धामुळे परतीच्या प्रवासात त्याला मार्ग बदलावा लागला. तसेच पाकिस्तानकडून व्हिसा न मिळाल्याने तो दुबईहून विमानाने कोचीला आला. कोचीवरून रस्ते मार्गाने कर्नाटक, गोवा, कोल्हापूर, कराड असा प्रवास करून 17 डिसेंबर रोजी तो मुंबईत पोहचलो. या मोहिमेद्वारे रस्ते सुरक्षा आणि जबाबदार नागरिक याबाबतचा संदेश त्याने नागरिकांना दिला.