या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करताना, टॉप ट्रॅव्हल एजन्सी असोसिएशन पुणेचे अध्यक्ष निलेश भन्साळी म्हणाले की, प्रत्येक पर्यटक हा आमच्या परिवाराचा एक भाग आहे. सरकार निश्चितच परिस्थिती हाताळू शकते, मात्र नागरिक आणि ट्रॅव्हल एजन्सीजचीही काही जबाबदारी आहे.
ते पुढे म्हणाले की, हल्ल्याचा उद्देश काश्मीरमध्ये स्थिर होत असलेल्या शांतता आणि पर्यटनाला धक्का देणे आहे. त्यामुळे स्थानिक लोकांचा रोजगार धोक्यात येण्याची भीती आहे. हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी आपल्या बुकिंग्स् रद्द करण्यास सुरुवात केली आहे. ट्रॅव्हल एजन्सीजकडून कोणत्याही प्रवाशावर तिकडे प्रवासासाठी दबाव टाकला जात नाही. एअरलाईन्सने 7 तारखेपर्यंत बुकिंग रद्द केल्यास रिफंड देण्याची घोषणा केली आहे, परंतु त्यानंतरचे प्रवास असल्यास ग्राहकांना रिफंड मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर भन्साळी यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, कॅन्सलेशनसाठी 31 मेपर्यंत मुदत वाढवावी व क्रेडिट नोट न देता थेट रक्कम परत करण्यात यावी, जेणेकरून ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळू शकेल.
advertisement
Kashmir Tourism: काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला, कोल्हापूरचा उद्योग संकटात, नेमकं काय घडतंय?
काश्मीरमध्ये दरवर्षी सुमारे 2.5 कोटी पर्यटक भेट देतात. याशिवाय अमरनाथ यात्रा व वैष्णो देवी यात्रेसाठीही लाखो भाविक प्रवास करतात. महाराष्ट्र व गुजरात हे काश्मीरसाठी मोठे मार्केट असून, त्यात मुंबई आणि पुणे क्रमांकाने आघाडीवर आहेत. त्यामुळे पहलगाम हल्ल्याचा थेट परिणाम पुण्यातील पर्यटन व्यवसायावर झाल्याचे भन्साळी यांनी सांगितले.