पुणे: पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक विकेंडला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात. पुणे शहराला स्वतःची एक ओळख असून शहरात कोणत्याही ऋतूत आल्हाददायक वातावरण असते. शिवाय पुण्याच्या आसपास अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही कधीही पिकनिकसाठी नक्कीच जाऊ शकता. तर पुण्यापासून अगदीच जवळ असलेले कासारसाई धरण असून पर्यटकांची मोठी गर्दी ही पाहायला मिळते.
advertisement
पुण्यापासून 30 तर हिंजवडी पासून 12 ते 15 किमीच्या अंतरावर असलेले हे कासारसाई धरण पर्यटकांसाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. हा परिसर जर पाहिला तर इथे संपूर्ण चारही बाजूने डोंगरकडा आहेत. अगदी जवळच आयटी पार्क देखील पाहायला मिळतो.
शिवरायांचा भव्य पुतळा, निसर्गरम्य वातावरण, पर्यटनासाठी अमरावतीमधील अतिशय सुंदर असं लोकेशन
बोटिंग रायडिंग, बाईक रायडिंग, लहान मुलांना खेळण्यासाठी, राहण्यासाठी टेंट, जेवण्यासाठी उत्तम असे हॉटेल आहेत. त्याच धरणा शेजारी फिल्म सिटी अशा सर्वच गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतात. त्यामुळे इथे येणारा पर्यटक हा अगदी ह्या निसर्ग सौंदर्यात रममाण होतो. त्यामुळेच जर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणाला आवर्जून भेट देऊ शकता.
रिसॉर्ट, हॉटेल आणि टेंट इथे आहेत. वेगवेगळे इव्हेंट याठिकाणी साजरे होत असतात. 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारी असो हे सेलिब्रेट करण्यासाठी ही मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. मावळ, मुळशी, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातून ही लोक येतात, असं येथील व्यवसायीकांनी सांगितलं.