काय आहे उद्देश?
पिंपरी चिंचवड जवळचे पिंपळे निलखमध्ये राहणारे विवेक सोनावणे आणि कुटुंब हा प्रवास करणार असून त्यासाठी ते लंडनच्या दिशेनं निघालेत. मुळचे लोणावळाचे असणारे विवेक हे व्यवसायानं इंजिनिअर आहेत. 'वसुधैव कुटुंबकम' म्हणजेच 'विश्व हे एक कुटुंब' आहे. ते नेहमी एक राहिले पाहिजे हा संदेश देण्यासाठी ते हा प्रवास करणार आहेत.
advertisement
कार चमकण्यासाठी करा ‘हा’ उपाय, कोणत्याही दिवशी चकाचक दिसेल तुमची गाडी
भारतीय संस्कृतीचं दर्शन या प्रवासातून करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विवेक सोनावणे यांच्यासह सुनिता सोनावणे, ओमकार सोनावणे आणि आयुष सोनावणे हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यही हा प्रवास करणार आहेत.
कसा करणार प्रवास?
सोनावणे कुटुंब हे 120 दिवसांमध्ये तब्बल 30 हजार किलो मीटर रस्त्यानं प्रवास करणार आहे. दुबई, इराण, तुर्की, बल्गेरिया, डेन्मार्क, जर्मनी, स्विझरलँड, इटली, फ्रान्स आणि इंग्लंड या प्रमुख देशांमधून ते प्रवास करणार आहेत. यामध्ये ते तीन वेळा बोटीतून आणि एकदा पानबुडीतूनही प्रवास करणार असल्याची माहिती सोनावणे यांनी दिली. या पद्धतीनं प्रवास करणारं आपलं पहिलं मराठी कुटुंब आहे, असा दावा त्यांनी केला.