कार चमकण्यासाठी करा ‘हा’ उपाय, कोणत्याही दिवशी चकाचक दिसेल तुमची गाडी

Last Updated:

आपली कार स्वच्छ असावी. छान चमकावी अशी प्रत्येक कार मालकाची इच्छा असते.

+
News18

News18

पुणे, 1 सप्टेंबर : आपली कार स्वच्छ असावी. छान चमकावी अशी प्रत्येक कार मालकाची इच्छा असते. त्यासाठी ते वेगवेगळे उपाय करतात. कार चमकवण्यासाठी काय उपाय करावेत? तुमच्या कारसाठी कोणती गोष्ट फायदेशीर ठरेल? याची माहिती पुण्यातल्या केअर प्रो स्टुडिओचे अभिषेक गट्टेवार यांनी दिलीय.
कार चमकवण्यासाठी कोटिंग करणे आवश्यक आहे. कोटिंग हे सिंथेटीक सीलंट आहे. ते लेयर किंवा कोट तयार करुन कारच्या पेंटचे संरक्षण करतात.हा थर पाऊस, धूळ, उष्णता आणि थंडी या नैसर्गिक घटकांच्या प्रभावापासून पेंटचे संरक्षण करतो. कारचा रंग चमकदार ठेवण्यासाठी लोक याचा वापर करतात.टेफ्लॉन कोटिंगला पॉली-टेट्रा-फ्लोरो-इथाइलीन (पीटीएफई) म्हणूनही ओळखले जाते. हे एक सिंथेटिक फ्लोरोपॉलिमर आहे. हे नॉन-स्टिक कुकवेअरसाठी वापरलेल्या टेफ्लॉन कोटिंगप्रमाणेच कार आणि बाईकवर वापरले जाते. तुमच्या कारवर केलेले कोटिंग त्वरित दुसऱ्या कोटच्या गरजेशिवाय दीर्घ कालावधीसाठी एक चमकदार आणि ग्‍लॉसी लुक येतो, अशी माहिती गट्टेवार यांनी दिली.
advertisement
कोटिंगचे फायदे
आपण कार कापडानं पुसतो तेंव्हा पेंटच्या पृष्ठभागावर लहान ओरखडे निघू शकतात. कारवर कोटिंग केल्यानं ही धूळ काढणे सोपे जाते. पाण्याचे डाग कारच्या पेंट पृष्ठभागासाठी हानिकारक असू शकतात. हे कठीण डाग जास्त मजबूत होऊ शकतात. कोट कारच्या पृष्ठभागावर पाणी राहू देत नाही त्यामुळे चमक टिकवून राहते. तुमची कार जास्त काळ चमकदार दिसते.
advertisement
कोट टिकण्यासाठी काय कराल?
कार आवश्यक असेल तेव्हा दर्जेदार कार वॉशने धुवा. मायक्रो फायबर कापड वापरुन धूळ पुसा. बजेटनुसार तुम्ही कारचं कोटिंग निवडू शकता. त्यामुळे धूळ, धूप, तसंच वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीपासून तुमच्या कारचं संरक्षण होईल, असा सल्ला गट्टेवार यांनी दिला.
advertisement
मराठी बातम्या/पुणे/
कार चमकण्यासाठी करा ‘हा’ उपाय, कोणत्याही दिवशी चकाचक दिसेल तुमची गाडी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement