वेताच्या काठीपासून बनवलेल्या वस्तू अवघ्या 30 रुपयात; डेकोरेशन, अन्यथा भेटवस्तूसाठी बेस्ट पर्याय!
- Published by:News18 Marathi
Last Updated:
घर सजवण्यासाठी लागणारे वेताच्या काठीपासून बनलेले होम डेकोरचे सामान आणि अनेक प्रकारच्या भेट वस्तू मुंबईत स्वस्तात कुठे मिळतील याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मुंबई, 31 ऑगस्ट : घर सजवण्याची आवड तर प्रत्येकालाच असते. महिलांना आपले घर सुशोभीत ठेवण्याचा एक वेगळाच छंद असतो. आपल्या घराचं वेगळेपण जपण्यासाठी वेगवगेळ्या वस्तू घेण्याचा प्रयोगही केला जातो. पण, या वस्तू महाग असल्यानं सर्वांनाच खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे घर सजवण्यासाठी लागणारे वेताच्या काठीपासून बनलेले होम डेकोरचे सामान आणि अनेक प्रकारच्या भेट वस्तू मुंबईत स्वस्तात कुठे मिळतील याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कुठे कराल खरेदी?
मुंबईच्या सर्वात मोठ्या होलसेल बाजारपेठात म्हणजेच क्रॉफर्ड मार्केटमध्ये इंडिया केन हाऊस या दुकानात वेताच्या काठीपासून बनलेले विविध प्रकारचे होम डेकोरेशन शोपीस, भेट वस्तू आणि वेगवेगळ्या प्रकारचे साईज रेंजचे बास्केट्स येथे मिळत आहेत. सणावाराला कोणाला गिफ्ट हँपर द्यायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे आणि वेगवेगळ्या आकाराचे बास्केट या ठिकाणी होलसेल दरात विकत घेऊ शकता.
advertisement
या ठिकाणी मिळणारे हे केन प्रॉडक्ट्स वेताच्या काठी पासून तयार केलेले आहेत. टोपली बदकाच्या आकाराचे बास्केट, विकर बास्केट, परडी, कंदील,टोपली अश्या वेगवगेळ्या वस्तू या ठिकाणी मिळतात. येथील केन प्रॉडक्ट हे इको फ्रेंडली आहेत आणि सहजरीत्या त्याचे विघटन होते. या बास्केट्समध्ये आपण मिठाई - चॉकलेट इत्यादी भरून एखाद्याला भेट देऊ शकतो. या ठिकाणी मिळणारे वेगवेगळ्या आकाराचे शोपीस त्याचबरोबर बास्केट भारताच्या विविध ठिकाणांच्या कारागीरांकडून बनवले जाते.
advertisement
काय आहे किंमत?
क्रॉफर्ड मार्केट मधील या इंडिया केन हाऊस या दुकानात सुंदर सुंदर बास्केट आणि होम डेकोरचे सामान अगदी होलसेल भावात मिळेल. या केन प्रॉडक्टची किंमत 30 रुपयांपासून सुरू होते ते बास्केटच्या साईज प्रमाणे वाढते. सर्वात अधिक मागणी असलेल्या लाकडी बदकाच्या आकाराच्या बास्केटची किंमत येथे 400 ते 700 रुपये अशी आहे. ती तुम्ही येथे स्वस्त दरात खरेदी करू शकता. पिकनिकला जाताना खाण्याचा वस्तू ठेवण्यासाठी लागणारे बास्केट येथे होलसेल दरात मिळतील. भेट वस्तूसाठी लागणारे लहान लहान बास्केट येथे 30 रुपयांपासून ते अगदी 2 हजार रुपयांपर्यंत मिळतील. ज्यांना अँटिक्सने आणि शॉपिसच्या वस्तूने घर सजवण्याची आवड असते ते या ठिकाणी येऊन आवडीने खरेदी करतात,अशी माहिती दुकान मालक युसुफ यांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 31, 2023 5:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
वेताच्या काठीपासून बनवलेल्या वस्तू अवघ्या 30 रुपयात; डेकोरेशन, अन्यथा भेटवस्तूसाठी बेस्ट पर्याय!