पुणे शहरातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या कात्रज प्राणी संग्रहालयात दररोज हजारो पर्यटक भेट देतात. गेल्या काही वर्षांमध्ये संग्रहालयातील प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यानुसार त्यांच्या आहाराचे, आरोग्यसेवेचे, निवासाचे आणि देखभालीचे खर्चही अनेक पटींनी वाढले आहेत. तसेच अनेक नवीन प्रजातींचा समावेश करण्यात येत असून, त्यांच्यासाठी विशेष निवासस्थान, आरोग्य सुविधा तसेच जैवविविधतेच्या अभ्यासासाठी आधुनिक तंत्रसुविधा उभारण्यास मोठा निधी आवश्यक आहे. यामुळे तिकीट दरवाढ अपरिहार्य झाली असल्याचे प्रशासनाचे स्पष्ट मत आहे.
advertisement
Weather Alert: काळजी घ्या! रविवारी ‘कोल्ड वेव्ह’चा इशारा, पुण्यात 24 तासांसाठी अलर्ट
संग्रहालय विस्ताराच्या दृष्टीने देखील महापालिकेने मोठा आराखडा तयार केला आहे. सविस्तर पाहणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. प्राणी संग्रहालयाच्या या विस्तारीकरणानंतर झेब्रा, पिसोरी हरिण आणि लायन टेल्ड या प्रजातींसाठी प्रदर्शनी उभारली जात आहे. सोबतच मॉर्मोसेट, रानकुत्रा यासाठी देखील खंदक तयार केली जाणार आहेत. सोबतच नवीन सर्पोद्यानाची उभारणी करण्यात येणार असून, नागरिकांसाठी आधुनिक सोयीसुविधा वाढविण्याचे देखील काम सुरू आहे.
सध्याचे दर काय?
सध्या लहान मुलांचे (4 फूट 4 इंच उंचीपर्यंत) तिकीट 10 रुपये असून, प्रस्तावानुसार ते 20 रुपये करण्यात येणार आहे. तर प्रौढ व्यक्तींसाठीचे 40 रुपयांचे तिकीट आता 60 रुपयांपर्यंत वाढणार आहे. विदेशी नागरिकांसाठी शुल्क 900 रुपयांवरून वाढवून 1350 रुपये करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठीचे विशेष दरही वाढवण्यात येणार आहेत.






