सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वच्छ आणि सुंदर सागरी किनारे लाभल्याने निसर्गाचे एक वरदान मिळालेले आहे. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणुन ओळखला जातो. दर वर्षी लाखो पर्यटक या जिल्ह्याला भेट देत असतात. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील एका प्रसिद्ध बीच बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
मालवणपासून अवघ्या 7 किमी अंतरावर अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भुत सौंदर्य तारकर्ली येथे पाहण्यास मिळते. विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन यामुळे तारकर्ली किनाऱ्यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येतो. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते.
advertisement
मालवणचा पर्यटन वारसा, विद्यार्थी आणि पर्यटकांची पहिली पसंती
येथे थांबून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी रिसॉर्ट आपल्या सेवेत हजर आहेत. येथील समुद्र किनारे एवढे नितळ, स्वच्छ आहेत की पाण्यातील सौंदर्य अगदी साध्या डोळ्यांनी न्याहाळता येते. निळेशार पाणी आणि क्षितिजापर्यंत पसरलेला किनारा रोजच्या ताणतणावापासून दूर ठेवतो. मनाला शांतता मिळते. गर्दीपासून दूर शांत, निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखे आहे.
तंबूत निवास, नावेतून सफर आणि स्कूबा डायव्हिंगचा अनुभवदेखील येथे घेता येतो. एमआयडीसीने तारकर्लीला प्रसिद्धी मिळवून देण्यात विशेष हातभार लावला आहे. जलक्रीडासाठी हे बीच प्रसिद्ध आहे. स्कुबा डायव्हिंग आपण अरबी समुद्रात पाणी खाली कोकण अन्वेषण करू इच्छिता असाल तर या ठिकाणी ओपन वॉटर, प्रगत पाणी, बचाव पाणबुड्या, दिवे मास्टर, प्रमाणित डायविंग खेळाची, स्कुबा डायविंग,अशी विविध जलक्रीडा करायला मिळतात. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या प्रसिद्ध स्थळाला नक्की भेट द्या.