TRENDING:

प्रवाशांना दिलासा! नाशिकमार्गे धावणार उन्हाळी अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या, कुठून कुठपर्यंत असणार?

Last Updated:

रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नाशिक मार्गे भिवंडी-सांकराईल आणि खडगपूर-ठाणे दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नाशिक: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नाशिक मार्गे भिवंडी-सांकराईल आणि खडगपूर-ठाणे दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता उन्हाळ्यात प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.
News18
News18
advertisement

या विशेष गाड्यांमध्ये भिवंडी–सांकराईल अनारक्षित साप्ताहिक विशेष – 3 सेवा, 01149 अनारक्षित विशेष 23 एप्रिलपर्यंत दर बुधवारी भिवंडी येथून 22:30 वाजता सुटेल आणि सांकराईल माल टर्मिनल यार्ड येथे तिसऱ्या दिवशी दुपारी 1:00 वाजता पोहोचेल. दरम्यान या गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खडगपूर येथे थांबे देण्यात आले आहेत.

advertisement

Mumbai Traffic: मुंबईत महावाहातूककोंडी! 15 एप्रिलनंतर दादरमध्ये Traffic Jam, पण कारण काय?

यूटीएसद्वारे बुक करा तिकीट

View More

खडगपूर-ठाणे अनारक्षित साप्ताहिक विशेष 3 सेवेमध्ये 01150 अनारक्षित विशेष दिनांक 12 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत दर शनिवारी खडगपूर येथून 23.45 वाजता सुटेल आणि ठाणे येथे तिसऱ्या दिवशी 10.30 वाजता पोहोचतील. या गाड्यांना टाटानगर, चक्रधरपूर, राउरकेला, झारसुगुडा, बिलासपूर, रायपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण येथे थांबे देण्यात आले आहेत. या अनारक्षित विशेष गाड्या आणि कोचसाठी तिकिटे सामान्य शुल्कात यूटीएसद्वारे बुक करता येतील.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
प्रवाशांना दिलासा! नाशिकमार्गे धावणार उन्हाळी अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या, कुठून कुठपर्यंत असणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल