TRENDING:

Travel : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत मुलांना फिरायला घेऊन जाताय? मुंबईतील या ठिकाणाला द्या भेट, ट्रिप होईल जबरदस्त

Last Updated:

मुलांना फिरायला कुठे घेऊन जावं? जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर मुंबईतील नेहरू तारांगण हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. बऱ्याच लोकांना वाटतं की नेहरू तारांगण म्हणजे फक्त अभ्यास किंवा विज्ञानाशी संबंधित ठिकाण आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की पालकांसमोर एकच प्रश्न उभा राहतो मुलांना फिरायला कुठे घेऊन जावं? जर तुम्हीही असाच विचार करत असाल, तर मुंबईतील नेहरू तारांगण हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. बऱ्याच लोकांना वाटतं की नेहरू तारांगण म्हणजे फक्त अभ्यास किंवा विज्ञानाशी संबंधित ठिकाण आहे. मात्र, प्रत्यक्षात हे ठिकाण मुलांसाठी तितकंच रोचक आणि मजेशीर आहे. केवळ 80 रुपयांच्या प्रवेश शुल्कात इथं तुम्ही आणि तुमची मुलं विज्ञानाच्या मनोरंजक जगात रमून जाल.
advertisement

मे महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांसाठी शिक्षण आणि मनोरंजन यांचा मिलाफ असलेली सहल प्लॅन करत असाल, तर मुंबईतील नेहरू तारांगण ही एक उत्तम जागा ठरू शकते. अनेक पालकांना वाटतं की हे ठिकाण फक्त अभ्यासाशी संबंधित आहे, पण प्रत्यक्षात इथे मुलांना विज्ञानाचा खजिना अनुभवता येतो. तोही मजेशीर पद्धतीने आणि अगदी माफक दरात.

advertisement

पैशाची नाही, पुस्तकांची बँक! गरीब विद्यार्थ्यांसाठी 'या' शाळेचा अनोखा उपक्रम, ‘ज्ञानदानचा नवा मार्ग

नेहरू तारांगणामध्ये खास मुलांसाठी आणि कुटुंबासाठी खालील गोष्टी पाहायला मिळतात:

View More

1) Sky Theatre Show: गोल थिएटरमध्ये 360 डिग्री स्क्रीनवर ब्रह्मांडाची सफर, ग्रह, तारे, चंद्र यांची थरारक माहिती.

advertisement

2) सोलर अ‍ॅक्टिव्हिटी शो: सूर्य आणि सौरमंडळावरील अभ्यास अ‍ॅनिमेशनसह सादर केला जातो.

3) इंटरेक्टिव्ह सायन्स गॅलरी: प्रत्यक्ष प्रयोग, विज्ञान खेळणी, प्रकाश, ध्वनी, चुंबकत्व यांसारख्या संकल्पनांचे प्रयोग करता येतात.

4) खगोल निरीक्षण: दुर्बिणीद्वारे चंद्र व ग्रहांचं निरीक्षण (विशिष्ट दिवशी रात्री).

advertisement

5) वर्कशॉप्स आणि क्विझ: शालेय गटांसाठी खास कार्यशाळा, विज्ञान क्विझ स्पर्धा.

हे ठिकाण वरळी, मुंबई येथील नेहरू सेंटरमध्ये आहे. येथे पोहोचण्यासाठी दादर किंवा परळ स्थानकावरून बस किंवा टॅक्सी घेता येते. सोमवार वगळता हे तारांगण आठवड्यातील सर्व दिवशी सुरू असतं, आणि शोचे वेळापत्रक वेबसाइटवरही उपलब्ध असते. तिकिटं ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष काउंटरवर घेता येतात.

advertisement

मुलांना विज्ञानात गोडी निर्माण करायची असेल, तर नेहरू तारांगणसारखं ठिकाण सुट्टीत नक्की भेट देण्यासारखं आहे. शिकता शिकता मजा आणि आठवणीत राहणारा अनुभव एकाच ठिकाणी मिळतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
Travel : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत मुलांना फिरायला घेऊन जाताय? मुंबईतील या ठिकाणाला द्या भेट, ट्रिप होईल जबरदस्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल