समृद्धी महामार्ग हा एलिव्हेटेड मार्ग आहे. ज्यामुळे अनेकदा वाहन चालकांना आपल्या स्पीडचा अंदाज येत नाही. महामार्गावर अनेक ठिकाणी वळणे आहेत. वाहनाची गती अधिक असल्यानंतर या वळणावरून देखील अपघात होण्याची शक्यता असते.
advertisement
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्ता आणि टायरमधील घर्षण बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असते. यामुळे समृद्धी महामार्गावर वाहन चालवण्यासाठी ठरवून देण्यात आलेल्या स्पीडपेक्षा 20 किमी प्रति तास कमी वेगाने वाहन चालवावे जेणेकरून गाडी स्किड होण्याची शक्यता कमी होते आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, असं चंद्रमोहन चिंतल यांनी सांगितलं.
समृद्धी महामार्गावर चार चाकी वाहनांसाठी 120 किमी प्रति तास एवढी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे तर व्यावसायिक वाहनांसाठी 80 किमी प्रति तास एवढी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कार चालकांनी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना 100 किमी प्रति तास या वेगाने वाहन चालवावे. तर व्यावसायिक वाहन असल्यास 60 ते 70 किमी प्रति तास या वेगाने वाहनाची गती असावी, असंही उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.