काय आहे तणावावर मात करण्याची 'गुरुकिल्ली'?
या संशोधनानुसार, तणावाला हरवण्याची गुरुकिल्ली दुसरी-तिसरी कोणतीही नसून, ती आहे 'नियंत्रणाची भावना' (A Feeling of Control). म्हणजेच, जेव्हा आपल्याला असं वाटतं की, परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे, तेव्हा आपण त्या समस्येचा अधिक चांगल्या प्रकारे सामना करू शकतो.
ही 'नियंत्रणाची भावना' नक्की काम कशी करते?
संशोधकांना असे आढळून आले की, ज्या दिवशी लोकांना त्यांच्या समस्यांवर आपले नियंत्रण आहे असे वाटले, त्या दिवशी त्यांच्याकडून त्या समस्या सोडवण्याची शक्यता तब्बल 62% जास्त होती.
advertisement
याचा अर्थ स्पष्ट आहे : जेव्हा तुमच्या हातात परिस्थितीची सूत्रं आहेत असं तुम्हाला वाटतं, तेव्हा तुम्ही त्या समस्येवर रडत बसण्याऐवजी, त्यावर उपाय शोधण्यासाठी पुढे सरसावता. हा सकारात्मक दृष्टिकोन केवळ तुमचा तणावच कमी करत नाही, तर तुमचे मानसिक आरोग्यही सुधारतो. विशेष म्हणजे, अभ्यासात असेही दिसून आले की, वयानुसार लोकांमध्ये नियंत्रणाची ही भावना अधिक मजबूत होते, ज्यामुळे ते तणावाला अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतात.
मग, ही नियंत्रणाची भावना वाढवायची कशी?
संशोधक एक सोपा मार्ग सुचवतात: ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाहीत, त्यावर ऊर्जा वाया घालवण्याऐवजी, ज्या गोष्टी तुम्ही नियंत्रित करू शकता, त्यावर लक्ष केंद्रित करा.
एक सोपं उदाहरण घेऊया : तुम्ही तुमच्या ऑफिसमधील बॉसचे वागणे नियंत्रित करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यावर विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा, तुम्ही त्यांच्या वागण्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल, हे नक्कीच नियंत्रित करू शकता. तुम्ही शांत राहायचे की वाद घालायचा, हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे.
हाच मानसिक दृष्टिकोन तुम्हाला रोजच्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद देतो. त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा आयुष्यात तणाव येईल, तेव्हा परिस्थितीला दोष देण्याऐवजी, 'यात मी काय नियंत्रित करू शकतो?' हा एक प्रश्न स्वतःला विचारा. तुम्हाला तणावातून बाहेर पडण्याचा मार्ग आपोआप सापडेल.
हे ही वाचा : रात्री शांत झोप मिळत नाही? लगेच ट्राय करा 'हे' 6 नैसर्गिक उपाय, सुधारेल तुमची स्लीप सायकल!
हे ही वाचा : एकटेपणात उत्तम सोबती! घरात मांजर पाळण्याचे आहेत 5 मोठे फायदे, पण 'या' 4 जबाबदाऱ्याही लक्षात घ्या, अन्यथा...