पुण्यात सुचली कल्पना
अथर्व कुलकर्णी आणि मंगेश कुसुरकर या दोन शाळेपासून एकत्र असलेल्या मित्रांनी हे कॉफी शॉप सुरू केलंय. मंगेश हे वकील तर अथर्व फायनान्स क्षेत्रात काम करतात. आपण व्यवसाय करावा असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्नही केले. एकदा पुण्यात फिरायला गेल्यावर त्यांना एक कॉफीचे शॉप दिसले. त्यावेळी याच पद्धतीचं शॉप डोंबिवलीतही सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यामधूनच 'कॉफी टॉफी' ला सुरुवात झाली.
advertisement
चटणी लावून मोमो खाणे विसरा, आता कुल्हडमध्ये चमच्याने खाऊन तर पाहा, खास Video
हॉट आणि कोल्ड कॉफी सोबतच या दुकानांत मिळणाऱ्या मोजिटो , आईस टी आणि मिल्कशेकची चव देखील क्या बात है असं म्हणायला लावणारी आहे. जावा चीप कॉफी , कॅरेमल बटरस्कॉच फ्रेप, सिटी ब्राऊनी, डेव्हिल्स फ्रेप, हजलनट फ्रेप , कॅरमल कॅपाचीनो , सी टी लट्टे , सी टी लट्टे व्हेनीला , हॉट कोकोनट , नटेला हॉट चॉकलेट असे विविध फ्लेवर्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.
असे बनवतात शेक...
मिल्क, चॉकलेट चिप्स, चॉकलेट, बर्फ , पिठीसाखर, आणि फ्लेवर्स नुसार बटरस्कॉच आणि विविध जिन्नस वापरून हे मिल्क शेक बनवले जात आहेत. तर मोजिटो बनवताना देखील ते व्यवस्थित शेक करणे, त्यात फ्लेवर्स प्रमाणे योग्य पदार्थ योग्य प्रमाणात टाकणे या सर्व प्रोसेसमुळे त्या त्या फ्लेवरची चव अगदी सहजच त्या मोजीटोमध्ये उतरते.





