चटणी लावून मोमो खाणे विसरा, आता कुल्हडमध्ये चमच्याने खाऊन तर पाहा, खास Video

Last Updated:

ठाण्यात आता मातीच्या कपात म्हणजेच कुल्हडमध्ये चक्क मोमो पदार्थ सर्व्ह होतोय. 

+
News18

News18

ठाणे, 22 ऑगस्ट : तुम्ही आजवर मातीच्या कपात अनेक वेळा चहा प्यायला असाल. मातीच्या कपात चहा पिण्याची प्रथा आजही भारतात अनेक ठिकाणी पाळली जाते. ज्याला कुल्हड चाय म्हणून पण संबोधले जाते. अशाच जुन्या पद्धतीला एक नवीन आकार देत ठाण्यात आता मातीच्या कपात म्हणजेच कुल्हडमध्ये चक्क मोमो पदार्थ सर्व्ह होतोय.
कुठे मिळत आहे?
ठाण्याचा कोलबाड परिसरात असलेले मोमोज कॉर्नर नामक दुकानात युनिक फूड कुल्हड मोमो मिळत आहे. मंदार आणि साहिल मोरे ह्या दोन सख्या भावांनी आठ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या मोमोज कॉर्नर वर खवय्ये विविध प्रकारचे मोमोजचा आस्वाद घेण्यासाठी जमा होतात. सुरुवातीला एका छोट्या हात गाडीचा प्रवास आता वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे आउटलेट बनत असल्याचा सुरू आहे.
advertisement
कुल्हड मोमोचे वैशिष्ट्य? 
मातीच्या कपात सर्वप्रथम तळून घेतलेले मोमो पहिले एका वाटीत अनेक सॉसेस सोबत मॅरीनेट करून त्यांना कुल्हडमध्ये टाकले जाते. त्यावर भरपूर चीज आणि वेगवेगळे मसाले टाकून शेवटी त्यावर कणसाचे दाणे घातले जातात. त्या फुलली लोडेड कुल्हडला पाच मिनिट ओवनमध्ये ठेवून गरम केले जाते. त्यानंतर त्या संपूर्ण कुल्हडला खवय्यांच्या हाती एका चमचा सोबत दिले जाते.
advertisement
हा चविष्ट कुल्हड मोमो या ठिकाणी 90 रुपये या किमतीत उपलब्ध आहे. येथील युनिक फूडमुळे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतो. मोमोज कॉर्नर या ठिकाणी मोमोजच्या अनेक व्हरायटी बरोबरच चायनीजचे राईस आणि नूडल्सचे प्रकार देखील अवघ्या पॉकेट फ्रेंडली किमतीत उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ मिळतात. उत्कृष्ट हायजिन पाळत खास शाकाहारी खवय्यांसाठी एक वेगळे किचन या ठिकाणी आहे. जेथे शाकाहारीसाठी वेगळे जेवणाचे सामान देखील वापरले जाते,अशी माहिती मोमोज कॉर्नरचे मालक मंदार मोरे यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
चटणी लावून मोमो खाणे विसरा, आता कुल्हडमध्ये चमच्याने खाऊन तर पाहा, खास Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement