मिल कामगाराच्या मुलानं लावला वडापावचा शोध, बाळासाहेब ठाकरेंपासून सचिनपर्यंत सर्वांनीच चाखलीय चव
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
केवळ मुंबईकरच नव्हे तर या वडापावची भूरळ पार विदेशी नागरिकांनादेखील आहे. या वडापावचा नेमका शोध कसा लागला पाहा
मुंबई, 22 ऑगस्ट : मुंबई या मायानगरीचं नाव जरी घेतलं तरीदेखील अनेक गोष्टी धडाधड डोळ्यासमोर उभ्या राहतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे मुंबईचा फेमस वडापाव. मुंबई आणि मुंबईचा वडापाव या दोघांचं नात काही औरच आहे. केवळ मुंबईकरच नव्हे तर या वडापावची भूरळ पार विदेशी नागरिकांनादेखील आहे. खरंतर वडापाव हा पदार्थ लोक चवीने आणि तितक्याच आवडीने खातात. मात्र, या वडापावचा नेमका शोध कसा लागला किंवा कोणत्या व्यक्तीच्या डोक्यात वडापाव तयार करण्याची पहिली कल्पना आली हे फार कमी जणांना माहित असेल. त्यामुळेच वडापावचा शोध लावणाऱ्या एका व्यक्तीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
कोणी लावला शोध?
1978 मध्ये अशोक वैद्य या गृहस्थांनी वडापावचा शोध लावला. त्यांचा दादर स्टेशन बाहेर एक फूड स्टॉल होता. त्यावेळी बटाट्याची भाजी आणि चपाती खाण्यापेक्षा त्यांनी बटाट्याची भाजी बनवून तिला बेसन पीठामध्ये बुडवून त्याचा वडा तयार केला. आणि चपाती ऐवजी तो पावाबरोबर खायला दिला जाऊ लागला. त्या काळात सर्वसामान्यांना परवडेल आणि पोट भरेल असा वडापाव हळूहळू प्रसिद्ध झाला.
advertisement
Oh, कोबीच्या पानात सर्व्ह केली जाते चायनीज भेळ; कुठं मिळेल?
त्याकाळात 1970 ते 1980 च्या दशकात मुंबईतील गिरण्या बंद पडल्याने अनेकांनी वडापावकडे उपजीविकेचे साधन म्हणून पाहिले. धकाधकीच्या जीवनात अशोक वैद्य यांनी अनेक जणांना धावपळ करताना पाहिलं होतं. मात्र, वेळ आणि पैशाच्या अभावामुळे पोटात भूक असतानादेखील या चाकरमान्यांना पुरेसं जेवण मिळत नव्हतं. त्यामुळेच कमी पैशात पोट भरेल असा पदार्थ तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि वडापावचा शोध लागला.
advertisement
'माझे दोन बंधू हे दिव्यांग आहेत. माझ शिक्षण हे बॉम्बे आयटीआय मधून इंजिनिअरिंग झालं असून घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य होतं. वडील हे मिल मजदूर कामगार होते. नोकरी धंदा नसल्यामुळे ज्यावेळी भूक लागायची त्यावेळी खायला मिळत नसे. अशावेळी बराच विचार करून व्यवसाय क्षेत्रात काहीतरी करावं म्हणून वडापावचा व्यवसाय 1978 मध्ये सुरू केला.
advertisement
सुरुवातीच्या काळात पाम तेलामध्ये तयार करण्यात आलेला वडापाव नंतर लोकांना आवडतो म्हणून गोड तेलामध्ये तयार करण्यास सुरुवात केली. यावेळी घरच्यांनी विरोध केला मात्र लोकांना पौष्टिक वडापाव मिळावा म्हणून त्या वेळेपासून आजपर्यंत उत्कृष्ट तेलामध्येच वडापाव तयार करून लोकांना दिला जातो. हा वडापाव तयार करताना तीन प्रकारच्या चटणींचा वापर करण्यात येतो. हिरवी तिखट चटणी, गोड चटणी, आणि सर्वात स्पेशल 44 प्रकार मिळून तयार केलेला घाटी मसाला यामुळे या वडापावच्या चवीत खवय्यांना आणखी मज्जा येते', असं अशोक वैद्य यांनी सांगितले.
advertisement
Video : बटाटा वड्याचा वेगळाच प्रकार, पावासोबत नाही तर स्टिकमध्ये अडकवून करतात सर्व्ह
'1978 साली 25 पैशाला हा वडापाव सुरू करण्यात आला होता आणि आज याची किंमत वाढता वाढता 30 रुपये इतकी झालेली आहे. वडापावची भुरळ फक्त सामान्य नागरिकांपुरतीच न राहता अभिनेते - अभिनेत्री, राजकीय मंडळी, राजकीय कार्यकर्ते, खेळाडू या सर्वांनाच पडलेली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ते अनेक सेलिब्रेटींनी हा वडापाव खाल्ला असून आजही ते अनेकदा इथं ऑर्डर करतात असं वैद्य यांनी सांगितलं.
advertisement
श्रीमंता पासून गरिबांपर्यंत प्रत्येकाच्या पोटाची खळगी भरणारा हा वडापाव अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे. त्यामुळे या वडापावला कधीही मुंबईकरांनी विसरू नये' असं आवाहन वैद्य यांनी केलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 22, 2023 8:43 AM IST
मराठी बातम्या/Food/
मिल कामगाराच्या मुलानं लावला वडापावचा शोध, बाळासाहेब ठाकरेंपासून सचिनपर्यंत सर्वांनीच चाखलीय चव

