Powai Hostage Case : 48 तासआधी त्याच लोकेशनला होता, जिथे झाला रोहित आर्यचा एन्काऊन्टर; मराठी अभिनेत्याचा रुचिरा जाधवपेक्षा भयंकर अनुभव
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Powai Hostage Case : रुचितानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्यानं पोस्ट लिहित रोहित आर्यबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. घटनेच्या 48 तास आधी अभिनेता रोहित आर्यसोबत होता.
30 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या पवई येथील RA स्टुडिओमध्ये रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीने 17 लहान मुलांना ओलीस ठेवलं. रोहित आर्यकडे पोलिसांनी फायर गन आढळली. लहान मुलांना काही होऊ नये म्हणून पोलिसांनी राहित आर्यचा एन्काऊंट केला. या एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडली त्यादिवशी अनेक मराठी कलाकार तिथे येऊ गेले होते. रोहित आर्यच्या डोक्यात असं काही होतं असं कोणालाच वाटलं नव्हतं. दरम्यान अभिनेत्री रुचिता जाधव हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहिलत रोहित आर्यने तिला संपर्क केला होता, भेटायला बोलावलं होतं. तिला सिनेमाची स्टोरी सांगितली होती जी 30 ऑक्टोबरला घडलेल्या प्रसंगाचीच होती.
रुचितानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्यानं पोस्ट लिहित रोहित आर्यबद्दल धक्कादायक माहिती दिली आहे. मराठी मालिका सिनेमांत काम करणारा प्रसिद्ध मराठी अभिनेता आयुष संजीव याने सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिलंय, "घटनेच्या केवळ दोन दिवस आधी माझी रोहित आर्यशी भेट झाली होती. त्याने मला त्याच्या आगामी 'लेट्स चेंज 4' या चित्रपटात एका भूमिकेची ऑफर दिली होती. त्यावेळी त्याने सांगितलेली कथा आणि नंतर जे काही घडले त्या घटनेशी मिळती जुळती होती. ही संपूर्ण घटना माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप धक्कादायक आहे."
advertisement
"मी त्याला 8-9 वर्षांपासून ओळखतो. ती त्याच्याबरोबर सिनेमा केला होता. त्या ओळखीमुळे मला त्याच्या हेतूंवर शंका घेण्याचे काहीच कारण वाटले नाही."

आयुषने शेवटी सांगितलं, "जे काही घडले आहे ते अतिशय धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे आहे. मी वर्कशॉपमध्ये त्या मुलांनाही भेटले होतो आणि त्यांच्यासोबत काही फोटोही काढले होते. तेव्हा सर्व काही अगदी सामान्य वाटत होते. सुदैवाने, ती सर्व मुलं सुरक्षित आहेत."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 12:21 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Powai Hostage Case : 48 तासआधी त्याच लोकेशनला होता, जिथे झाला रोहित आर्यचा एन्काऊन्टर; मराठी अभिनेत्याचा रुचिरा जाधवपेक्षा भयंकर अनुभव


