अपमानास्पद वागणूक! अजित पवार गटाला मोठं खिंडार, 43 जणांचे तडकाफडकी राजीनामे

Last Updated:

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या 43 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे.

News18
News18
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या 43 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे. अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या कारणातून हे राजीनामे झाल्याची माहिती आहे. खरं तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशात एकाच वेळी 43 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तडकाफडकी राजीनामे दिल्याने अजित पवार गटात खळबळ उडाली आहे.
हे सर्व राजीनामे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्षाने अलीकडेच राजीनामा दिला होता. त्यांच्यासोबतच पक्षाच्या अल्पसंख्याक शहराध्यक्षाने देखील राजीनामा दिला आहे. त्या दोघांचेही कट्टर समर्थक असलेल्या ४३ कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची साथ सोडली आहे. यामुळे पुसद शहरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना मोठा झटका बसला आहे.
advertisement

43 जणांनी राजीनामे का दिले?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष पठाण अहमद खान नजीर खान यांनी दि. 27 ऑक्टोबर रोजी पक्षाच्या जिल्हाध्यक्षाकडे तर अल्पसंख्याक शहराध्यक्ष नन्हे खान चांद खान यांनी दि. 30 ऑक्टोबर रोजी यांनी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षाकडे राजीनामा दिला आहे. त्या दोघांच्या 43 कट्टर समर्थकांनी पक्षाचे शहराध्यक्ष मोहम्मद इरफान मोहम्मद फय्याज यांच्याकडे व्हॉट्सअॅपवर राजीनामे दिले आहेत. मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का बसला.
advertisement
आपली नाराजी व्यक्त करताना पठाण अमजद खान नजीर खान म्हणाले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे आपण कट्टर समर्थक आहोत. त्यांना मत मिळावे म्हणून समाजाच्या विरोधात जाऊन आम्ही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलो. त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं काम आम्ही केलं होतं. पण आम्हाला नेहमी अपमानास्पद वागणूक मिळत होती. त्यांचे खास निकटवर्तीय राज्यमंत्र्याला भेटू देत नव्हते, म्हणून आम्ही राजीनामा दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अपमानास्पद वागणूक! अजित पवार गटाला मोठं खिंडार, 43 जणांचे तडकाफडकी राजीनामे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement