साहेब.... I Love you! चाहत्याने तिकीटावर मागितली ऑटोग्राफ, राज ठाकरेंनी दिलेली रिअॅक्शन चर्चेत
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
राज ठाकरे यांचा फॅन असलेला एक प्रवासी थेट तिकीट घेऊन त्यांच्या समोर आला. त्याने चक्क राज ठाकरे यांना I love u म्हटलं आणि आपल्या तिकीटावर ऑटोग्राफ द्यावी अशी विनंती केली.
मुंबईत आज विरोधीपक्ष नेत्यांनी एकत्र येऊन सत्याचा मोर्चा काढला. या मोर्चाला विरोधीपक्षनेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील सहभागी झाले. या मोर्चात दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडीतून जाण्यापेक्षा लोकलने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. सकाळी जवळपास 5 लोकल दादर स्थानकातून सोडल्या. 23 मिनिटं वाट पाहून झाल्यावर राज ठाकरे यांनी ट्रेननं प्रवास केला. दादर ते चर्चगेट त्यांनी लोकलने प्रवास केला.
चाहता म्हणाला I love u, राज ठाकरे म्हणतात...
या प्रवासादरम्यान मनसे नेते देखील त्यांच्यासोबत होते. राज ठाकरे यांचा फॅन असलेला एक प्रवासी थेट तिकीट घेऊन त्यांच्या समोर आला. त्याने चक्क राज ठाकरे यांना I love you म्हटलं आणि आपल्या तिकीटावर ऑटोग्राफ द्यावी अशी विनंती केली. दादर रेल्वे स्थानकावर राज ठाकरे लोकलची वाट पाहत असताना एक तरुण चाहता त्यांच्या जवळ आला. त्या उत्साही तरुणाने आपल्या तिकिटाच्या पाठीमागे राज ठाकरे यांची ऑटोग्राफ मागितली. राज ठाकरे यांनीही हसतमुखाने त्याची मागणी पूर्ण करत तिकिटावर स्वाक्षरी केली. त्यानंतर त्या तरुणाने दोन वेळा राज ठाकरे यांना i love you म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या. चाहत्याच्या या प्रेमावर राज ठाकरे हसले आणि त्याचे आभार मानले.
advertisement
खिडकीजवळ बसून केला प्रवास
पुरेशी गर्दी कमी झाल्यावर राज ठाकरे लोकलच्या डब्यात शिरले. त्यांनी खिडकीच्या सीटवर बसून प्रवास केला, तर त्यांचे शेजारी अनिल शिदोरे होते. डब्यात मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची दाटी झाली होती. या प्रवासादरम्यान सामान्य चाहत्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत फोटो काढले, त्यांच्याशी हस्तांदोलन केले. गर्दीतूनही आपल्या नेत्याला भेटण्याची संधी मिळाल्यामुळे चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
advertisement
राज ठाकरे यांची लोकल वारी चर्चेत
view commentsनिवडणूक आयोगाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडी यांनी आज, शनिवारी 'सत्याचा विराट मोर्चा' आयोजित केला आहे. महाविकासआघाडी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे नेते आणि पदाधिकारी सहभागी होत आहेत. या मोर्चासाठी राज ठाकरे यांनी केलेली लोकलवारी विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2025 12:19 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
साहेब.... I Love you! चाहत्याने तिकीटावर मागितली ऑटोग्राफ, राज ठाकरेंनी दिलेली रिअॅक्शन चर्चेत


