Oh, कोबीच्या पानात सर्व्ह केली जाते चायनीज भेळ; कुठं मिळेल?
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
भेळ खायला अनेकांना आवडतं. ठाण्यात चक्क कोबीच्या पानात चायनीज भेळ सर्व्ह केली जाते.
ठाणे, 21 ऑगस्ट : भेळ खायला अनेकांना आवडतं. हा प्रसिद्ध स्नॅक्स प्रकार लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचाच आवडीचा आहे. यामध्ये चायनीज भेळचा अगदी चवीने आस्वाद घेतला जातो. चायनीज भेळ हा प्रकार पॉकेट फ्रेंडली दरामध्ये खायला मिळतो. त्यामुळे वडापाव, भाजीपावप्रमाणे आता चायनीज भेळ देखील नाक्या - नाक्यावर मिळते. ठाण्यामध्ये एका ठिकाणी चक्क कोबीच्या पानात चायनीज भेळ सर्व्ह केली जाते.
कशी झाली सुरुवात?
मुंबईमध्ये चायनीज भेळ फक्त नवी मुंबई आणि घाटकोपर या ठिकाणी मिळत असे. हे लक्षात घेता गणेश दत्ताराम शिंदे आणि भरत दत्ताराम शिंदे दोन भावंडांनी ठाण्यात या भेळची सुरुवात केली. त्यांनी ठाण्यात श्री मराठा फूड ऑफ वर्ल्ड यांची सुरुवात अठरा वर्षांपासून पूर्वी केली. या ठिकाणी चायनीज भेळ सोबतच मंचुरियन, पॅटीस, चायनीज राईस, चायनीज नूडल्स आणि श्वरमा असे विविध पदार्थ खायला मिळतात. हे श्री मराठा फूड ऑफ वर्ल्ड शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही असून शाकाहाऱ्यांसाठी दुसरे किचन सेक्शन वापरतात. त्यामुळे शाकाहारी खवय्ये देखील या ठिकाणी निष्काळजी येऊन विविध शाकाहारी स्नॅक्स पदार्थांचा आस्वाद घेतात.
advertisement
चायनीज भेळचे वैशिष्ट्य?
वडापाव प्रमाणे आता चायनीज भेळ हा प्रकार स्नॅक्स प्रकारात प्रसिद्ध होताना दिसून येत आहे. ठाण्याच्या श्री मराठा वर्ल्ड ऑफ फ़ूड या दुकानात चायनीज भेळच्या अनेक व्हरायटी अगदी पॉकेट फ्रेंडली किमतीत उपलब्ध आहे. या ठिकाणी चीज कॉर्न चायनीज भेळ लोक चवी चवीने खातात. या चविष्ट चायनीज भेळमध्ये सर्वप्रथम उकडलेले कणसाचे दाणे घेतात. त्यात मसाला घालून मंचुरियनचे तुकडे घातले जातात. त्यावर वितळलेले बटर आणि चीज घालून चायनीज भेळची शेव आणि उभट कापलेला कोबी शेजवान चटणी घालून एका पातेल्यात एक जीव केला जातो. चायनीज भेळ इको फ्रेंडली कोबीच्या पानात सर्व्ह केले जाते.
advertisement
Video : बटाटा वड्याचा वेगळाच प्रकार, पावासोबत नाही तर स्टिकमध्ये अडकवून करतात सर्व्ह
या चीझ चायनीज भेळची किंमत 50 रुपये अशी आहे. येथील चायनीज भेळ बरोबरच त्यांची शेजवान चटणी ही अधिक प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर चायनीज भेळला कोबीचा पानात सर्व्ह करण्याची पद्धत देखील खवय्यांना या ठिकाणी येण्यासाठी आकर्षित करते, अशी माहिती येथील मालक भरत दत्ताराम शिंदे यांनी दिली आहे.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 21, 2023 6:14 PM IST

