World Vada Pav Day : एकाच ठिकाणी खा कोळशाच्या भट्टीवर भाजलेले 6 वडापाव, पाहताच सुटेल तोंडाला पाणी

Last Updated:

पुण्यात एकाच ठिकाणी  सहा वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव मिळतात.

+
News18

News18

पुणे, 23 ऑगस्ट : मराठी तरुणाईचं आवडतं फास्ट फुड म्हणजे वडापाव. मुंबई आणि पुण्यातले वडापाव हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. पुण्यातल्या प्रत्येक भागातले वडापावचे गाडे असून तिथं नेहमी गर्दी असते. या गर्दीमध्ये आपला वडापाव इतरांपेक्षा हटके असावा असा सर्वांचा प्रयत्न असतो. पुण्यात एकाच ठिकाणी  सहा वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव मिळतात. जागतिक वडापाव दिनाच्या निमित्तानं पाहूया त्याचं खास वैशिष्ट्य
पुण्यातल्या पौड रोड भागात प्रतिक निळगुळकर यांनी 2018 साली एका छोट्याश्या गाड्यावर हा वडापाव सुरू केला. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे त्यांना तो गाडा देखील बंद करावा लागला. या संकटानंतरही ते खचले नाहीत. त्यांनी एका हटके कल्पनेसह पुन्हा एकदा बाजारात पाऊल ठेवलं.
advertisement
एकाच प्रकारचा वडापाव देण्यापेक्षा वडापावचे वेगवेगळे प्रकार निगुळकर यांनी सुरू केले. त्यांच्याकडं साध्या वडापावसह चीज बर्स्ट, तंदूर, झटका, पेरी पेरी, मेयोनीज आणि शेजवान असे प्रकार मिळतात. 'आपल्याला सगळीकडं नॉर्मल वडापाव मिळतात. यामध्ये काही तरी वेगळं करण्याचा मी विचार केला. त्यानंतर या 6 वडापावची कल्पना सुचली अशी माहिती त्यांनी दिली.
advertisement
किती आहे किंमत?
या वडापावची किंमत 25 रुपयांपासून सुरू होते. हे वडापाव कोळशाच्या एका भट्टी वर भाजले जातात. त्यानंतर ग्रील केले जातात. पांढऱ्या रंगाची खास चटणी आणि वेफर्ससोबत हे वडापाव सर्व्ह केले जातात.हे कुरकुरीत वडापाव खाण्यासाठी इथं नेहमी गर्दी असते.
कुठे खाणार?
शॉप. नंबर 4, देवयानी श्री अपार्टमेंट
शिवतीर्थ नगर, पौड रोड
advertisement
कोथरुड, पुणे
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
World Vada Pav Day : एकाच ठिकाणी खा कोळशाच्या भट्टीवर भाजलेले 6 वडापाव, पाहताच सुटेल तोंडाला पाणी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement