तव्यावर फ्राय करून चवीने खातात खोपडी; भयानक दिसणारा हा खोपडी पिझ्झा खवय्यांचा फेव्हरिट!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
हा पिझ्झा केवळ खायलाच नाही, तर त्याला पाहायलाही लोक तुफान गर्दी करतात.
अभिलाष मिश्रा, प्रतिनिधी
इंदोर, 18 ऑगस्ट : पिझ्झा म्हटलं की कोणाच्याही तोंडाला चटकन पाणी सुटतं. केवळ लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनादेखील पिझ्झा प्रचंड आवडतो. कोणाला व्हेज पिझ्झा आवडतो, कोणाला नॉनव्हेज पिझ्झा आवडतो. मात्र तुम्ही कधी खोपडी पिझ्झा खाल्ला आहे का?
मध्यप्रदेशचं इंदोर शहर देश-विदेशात आपल्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. इथे नानाविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात. सध्या इथल्या चौपाटीवरचा खोपडी पिझ्झा भन्नाट लोकप्रिय झालाय. हा पिझ्झा केवळ खायलाच नाही, तर त्याला पाहायलाही लोक गुरुकृपा चाट हाऊस दुकानाबाहेर तुफान गर्दी करतात. कारण हा पिझ्झा दिसायला अगदी खोपडीसारखा दिसतो.
advertisement
गुरुकृपा चाट हाऊसचे मालक अजय यांनी या पिझ्झाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, 'सर्वात आधी गव्हाच्या पिठाचा बेस बनवून त्यात भरपूर मक्याचे दाणे, शिमला मिरची, पनीर आणि लिक्विड चीझ भरलं जातं. त्यानंतर त्याला खोपडीच्या पात्रात ठेऊन 7 ते 8 मिनिटं कोळश्याची धग दिली जाते. व्यवस्थित शेकवल्यानंतर तंदुरी सॉस लावून ते खोपडी पात्रातून बाहेर काढलं जातं. त्यानंतर पुन्हा जलद आचेवर शेकवलं जातं. पूर्ण बेस व्यवस्थित शेकल्यानंतर त्याला गार्निश करून चिप्स आणि सॉससोबत सर्व्ह केलं जातं.'
advertisement
मध्यप्रदेशात पहिल्यांदाच मिळणाऱ्या या खोपडी पिझ्झाची किंमत 120 रुपये आहे. त्यामुळे इतर पिझ्झाच्या तुलनेत हा पिझ्झा परवडणारा असल्याने लोकांची त्याला मोठी पसंती मिळते.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
August 18, 2023 4:12 PM IST
मराठी बातम्या/Food/
तव्यावर फ्राय करून चवीने खातात खोपडी; भयानक दिसणारा हा खोपडी पिझ्झा खवय्यांचा फेव्हरिट!