Video: वडापावप्रेमी असाल तर इथे भेट द्याच! उलटा वडापाव आणि उपवासाचा वडा खाऊन बोटं चाटत बसाल
- Published by:News18 Lokmat
Last Updated:
श्रावण महिन्याच्या उपवासातही बटाटा वडा खाऊ शकता. अथवा इथं उलटा वडापाववरही ताव मारू शकता.
डोंबिवली, 20 ऑगस्ट: श्रावण महिन्यात व्रत वैकल्ये केली जात असल्याने या महिन्यात अनेकांचे उपवास असतात. साबुदाणा वडा आणि खिचडी हे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. मात्र डोंबिवलीत आता उपवास थाळी आणि उपवासाला खाऊ शकतो असा हटके बटाटा वड्याचा खवय्ये आस्वाद घेत आहेत. पुरोषत्तम रानडे यांनी पत्नी चंद्रलेखा आणि मुलगी किरणने या हटके उपवास बटाटा वड्याचा शोध लावल्याचे सांगितले. याचबरोबर जर तुमचा उपवास नसेल तर तुम्ही येथील उलटा वडापाव देखील ट्राय करू शकता.
कशी झाली सुरुवात?
किरण फूड या नावाने सुरुवातीला आम्ही खाद्य पदार्थ बनवून विकत होतो. डोंबिवलीकरांना चव आवडल्याने त्यांनी विविध पदार्थांची ऑर्डर देण्यास सुरुवात केली. 2019 साली डोंबिवलीतील खंबालपाडा येथे दुकान होते. त्यानंतर लॉक डाऊनमध्ये आम्ही एमआयडीसी येथील विकास नाका परिसरात कॅन्टीन चालवायला सुरुवात केली. या दरम्यान रुग्णांना देखील जेवणाचा डब्बा देत होतो. त्याचवेळी उलटा वडा पाव ही संकल्पना सुरू केली आणि खवैय्यांनी त्याला प्रतिसाद दिला.
advertisement
उपवास थाळी
उपवास थाळी मध्ये साबुदाण्याचे थालीपीठ, श्रीखंड, शेंगदाणा चटणी, दही, साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याच्या किस हे पदार्थ आहेत. त्यामुळे उपवासाला एकच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर हा ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तसेच उपवास बटाटा वडा बनवताना शेंगदाण्याचा कूट, अरारोट, बटाटा हे पदार्थ वापरल्याची माहिती चंद्रलेखा रानडे यांनी दिली.
advertisement
उलटा वडापाव
उलटा वडापाव बनवण्यासाठी पाव फ्रीज मध्ये ठेवला जातो. त्यानंतर या पावाला मध्ये कापून त्यावर लसणाची चटणी आणि बटाटा वड्यासाठी वापरत असलेले बटाट्याचे सारण घातले जाते. हा पाव बेसनाच्या पिठात घोळवला जातो आणि त्यानंतर तेलात सोनेरी होईपर्यंत तळला जातो. त्यानंतर त्याचे चार तुकडे करून चटणी, सॉस, शेव, टाकून हा उलटा वडापाव सजवला जातो. तोंडात टाकताच अरे वा असे खवय्ये आवर्जून सांगतात.
advertisement
उदरभरण करणे सर्वात महत्त्वाचे असले तरी पौष्टीक खाणे देखील सध्याच्या लाईफ स्टाईलसाठी गरजेचे आहे. त्यामुळे डोंबिवलीतील चंद्रलेखाकडे 100 रुपयात पोटभर थाळी, 200 रुपयात उपवास थाळी, उपवास बटाटा वडा आणि उलटा वडा पाव नक्कीच ट्राय करा. पौष्टीक, चविष्ट आणि पोटभर खाण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
August 20, 2023 10:46 AM IST
मराठी बातम्या/Food/
Video: वडापावप्रेमी असाल तर इथे भेट द्याच! उलटा वडापाव आणि उपवासाचा वडा खाऊन बोटं चाटत बसाल