TRENDING:

World Sleep Day : अपुऱ्या झोपेमुळे नैराश्य येऊ शकतं ? मानसिक स्वास्थ्य आणि झोपेचा काय संबंध ?

Last Updated:

झोपेचा अभाव केवळ शारीरिक थकवा वाढवत नाही तर याचा मानसिक आरोग्यावरही खोलवर परिणाम होतो. नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्यांसाठी झोप विशेषतः महत्त्वाची मानली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 13 मार्च हा दिवस World Sleep Day म्हणून पाळला जातो. Sleep well, live better ही आहे यावर्षीची थीम म्हणजेच संकल्पना.
News18
News18
advertisement

झोप अपुरी असेल तर थकवा जाणवतो. यावर आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणंही समजून घ्या. झोपेचा अभाव केवळ शारीरिक थकवा वाढवत नाही तर याचा मानसिक आरोग्यावरही खोलवर परिणाम होतो. नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्यांसाठी झोप विशेषतः महत्त्वाची आहे. आकाश हेल्थकेअरच्या मानसोपचार विभागाच्या असोसिएट कन्सल्टंट डॉ. पवित्रा शंकर, झोप आणि नैराश्य आणि चिंता एकमेकांशी निगडित का आहेत ते स्पष्ट केलंय.

advertisement

चांगल्या आणि पुरेशा झोपेनं मनाचं संतुलन राखण्यास मदत होते. एखादी व्यक्ती गाढ झोप घेते तेव्हा मेंदू दिवसभराचं काम आणि भावनांवर प्रक्रिया करत असतो. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि विश्रांती मिळते. पण, झोप अपूर्ण असते किंवा वारंवार खंडित होते तेव्हा याचा परिणाम मेंदूच्या कार्यावर होऊ शकतो.

Eating Habits : नाईट इटिंग सिंड्रोमची कारणं काय ? नाईट इटिंग सिंड्रोमवर मात कशी करायची ? आयुर्वेदात आहे उत्तर

advertisement

कमी झोपेचा भावनांवर होणारा परिणाम समजून घेऊया.

सतत कमी झोपेमुळे मेंदूच्या भावनांचं नियमन करणाऱ्या भागांवर परिणाम होतो. यामुळे व्यक्ती अधिक चिडचिडी, तणावग्रस्त आणि अस्वस्थ होऊ शकते. ज्यांना सतत झोपेचा अभाव असतो त्यांना नैराश्य आणि चिंता होण्याचा धोका जास्त असतो असंही अनेक अभ्यासातून आढळून आलं आहे.

नैराश्य आणि झोपेचा संबंध.

मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नैराश्य आणि झोपेचा संबंध दुतर्फा आहे. कमी झोपेमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि मानसिक आरोग्य समस्या देखील झोपेत व्यत्यय आणू शकतात. उदाहरणार्थ, नैराश्यानं ग्रस्त असलेल्या अनेकांना झोप न येण्याचा त्रास होतो किंवा त्यांना वारंवार झोपेचा त्रास होतो.

advertisement

चिंताग्रस्त लोक जास्त विचार आणि तणावामुळे रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. झोपेचा अभाव एखाद्या व्यक्तीच्या मनःस्थितीवर, विचार करण्याच्या क्षमतेवर आणि भावनिक संतुलनावर परिणाम करू शकतो. यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो आणि दैनंदिन कामं करण्यात अडचण येऊ शकते. म्हणूनच मानसिक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी चांगली झोप हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

advertisement

मानसिक आरोग्यासाठी झोप का महत्त्वाची ?

झोपेचा आणि मानसिक आरोग्याचा जवळचा संबंध आहे. पुरेशी आणि दर्जेदार झोप भावनिक संतुलन राखण्यास मदत करते. दीर्घकाळ झोपेचा अभाव ताण, चिंता आणि नैराश्याची लक्षणं वाढवू शकतो. म्हणूनच, चांगलं मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.

Summer Care : उन्हाळ्यात पोटोबा ठेवा शांत, घरचं दही आणि ताक देतील पोटाला थंडावा

चांगली झोप येण्यासाठी, काही सोप्या सवयींची मदत होते. यामधे दररोज एका वेळी झोपायला जाणं आणि उठणं, झोपण्यापूर्वी मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर कमी करणं आणि कॅफिनचं सेवन मर्यादित करणं  याचा समावेश आहे. योग, ध्यान आणि नियमित व्यायाम देखील तणाव कमी करण्यास आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकराचा देशी जुगाड, गोडतेलावरची फ्यूल चूल, 7 रुपयांत एक तास चालणार!
सर्व पहा

एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ झोपेची समस्या येत असेल किंवा सतत ताण आणि चिंता येत असेल तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. यासाठी, तज्ज्ञांशी वेळेत सल्लामसलत केल्यानं मूळ कारण ओळखण्यास आणि योग्य उपचारांसह मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
World Sleep Day : अपुऱ्या झोपेमुळे नैराश्य येऊ शकतं ? मानसिक स्वास्थ्य आणि झोपेचा काय संबंध ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल