एका अभ्यासातून याबाबत ही बाब समोर आली आहे. शौचालयात मोबाईल फोन वापरतात त्यांना मोबाईल घेऊन शौचालयात न जाणाऱ्या लोकांपेक्षा मूळव्याध होण्याचा धोका 46% जास्त असतो.
या अभ्यासातली काही निरीक्षणं -
हा अभ्यास 'प्लॉस वन' नावाच्या मासिकात प्रकाशित झाला आहे. यात हार्वर्ड मेडिकल स्कूल हॉस्पिटलमधे येणाऱ्या अनेक पुरुष आणि महिलांना शौचालयात स्मार्टफोनच्या वापराबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यापैकी 66% लोक शौचालयात स्मार्टफोन वापरतात, तर उर्वरित 34 टक्के जणांनी टॉयलेटमधे मोबाईलचा वापर करणं टाळत असल्याचं सांगितलं.
advertisement
Hair Loss : झिंकची कमतरता आहे केस गळतीचं कारण, वाचा उपचारांविषयी सविस्तर माहिती
यानंतर, कोलोनोस्कोपीमधे काय निरीक्षणं आढळली पाहूया. जे लोक शौचालयात स्मार्टफोन वापरत नव्हते त्यांच्यापैकी फक्त 38% जणांना मूळव्याध होता, तर स्मार्टफोन वापरणाऱ्यांमधे हे प्रमाण 51% होते.
सर्व चाचण्या आणि निकषांचा विचार केल्यानंतर संशोधक एका निष्कर्षापर्यंत पोहचले. शौचालयात स्मार्टफोन वापरल्यानं मूळव्याध होण्याचा धोका 46% नं वाढतो असं यात आढळून आलं.
शौचालयात फोन वापरल्यानं मूळव्याध कसा होतो?
फोन वापरण्याचा आणि मूळव्याधांचा काय संबंध आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. खरं तर, टॉयलेट सीटवर बराच वेळ बसून तुम्हाला ही समस्या होऊ शकते. खालच्या भागावर सतत दाब दिल्यानं सूज येऊ शकते आणि नंतर यामुळे मूळव्याध होऊ शकतो.
Kishmish : दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या मनुकांचं पाणी, आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होतील दूर
शौचालयात फोनशिवाय जातात त्यांना बाहेर पडण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो. तर जे लोक फोन घेऊन जातात ते बराच वेळ तिथे बसून राहतात, कारण फोनवर आरामात बसून स्क्रोल करण्या त्यांचा बराच वेळ जातो असं या अभ्यासात दिसून आलं. 54 टक्के लोक शौचालयात वर्तमानपत्र वाचतात, तर 44 टक्के लोक सोशल मीडियाचा वापर करतात. थोडक्यात, तुमचाही वेळ शौचालयात जास्त जात असेल तर मूळव्याधाचा धोका तुम्हालाही आहे.