Kishmish : दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या मनुकांचं पाणी, आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होतील दूर

Last Updated:

रात्रभर भिजवलेले मनुके आणि मनुकांचं पाणी शरीराला ऊर्जा पुरवतात. पचन सुधारण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि त्वचेची चमक वाढवण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरतं.

News18
News18
मुंबई : सकाळी उठल्यानंतर तुम्ही दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीनं करत असाल तर आणखी एक पेयही तुमच्यासाठी चांगलं ठरेल. या दोन्हीऐवजी एक ग्लास मनुकांचं पाणी प्यायलं तर आरोग्यासाठी हे अधिक फायदेशीर ठरु शकतं.
सुकामेवा पौष्टिक आहेच त्यातल्या बेदाणे-मनुकांचं महत्त्व समजून घेऊया. आजी - पणजीपासूनचा हा आरोग्यदायी पौष्टिक खजिना आजच्या काळातही महत्त्व राखून आहे.
रात्रभर भिजवलेले मनुके आणि मनुकांचं पाणी शरीराला ऊर्जा पुरवतात. पचन सुधारण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि त्वचेची चमक वाढवण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरतं.
पचन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदे - मनुक्यांमधे असलेलं फायबर पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे. मनुका रात्रभर भिजवल्यानं मऊ आणि हलक्या होतात. मनुकांमधे असलेली प्रीबायोटिक घटक चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतात आणि आतड्यांचं आरोग्य संतुलित करतात. संशोधनातून ही बाब समोर आली आहे.
advertisement
शरीरासाठी आवश्यक ऊर्जा आणि लोह हे दोन्ही घटक मनुका आणि बेदाण्यातून मिळतात.
काळ्या मनुकात विशेषतः लोह असतं, लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी लोह आवश्यक असतं. दररोज मनुकांचं पाणी प्यायल्यानं शरीरातील थकवा कमी होतो आणि ऑक्सिजनचं प्रमाण चांगलं राहतं. अशक्तपणा आलेल्यांसाठी देखील मनुकांचं पाणी आरोग्यदायी आहे.
advertisement
हृदयाचं आरोग्य आणि रक्तदाब नियंत्रण : मनुकांमधे असलेलं पोटॅशियम आणि फायबर, रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाचं आहे.
त्वचेसाठी उत्तम : मनुकांच्या पाण्यात व्हिटॅमिन सी आणि ई असतं, कोलेजन तयार करण्यासाठी आणि त्वचेच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त आहे. यामुळे त्वचा निरोगी, चमकदार आणि तरुण दिसायला मदत होते.
advertisement
काळ्या मनुका - काळी द्राक्षं उन्हात वाळवून मनुका तयार होतात. लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर यात भरपूर प्रमाणात असतं.
बेदाणे - हिरवी द्राक्षं वाळवून त्यावर प्रक्रिया करुन बेदाणे तयार केले जातात. सल्फर डायऑक्साइडनं प्रक्रिया केलेले आणि मशीननं वाळवलेले बेदाणे मऊ आणि चवीला गोड असतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kishmish : दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या मनुकांचं पाणी, आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होतील दूर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement