रोज 10 मिनिटे ध्यान
हृदय रोग तज्ञांच्या मते, दररोज फक्त 10 मिनिटे शांत बसून ध्यान करणे किंवा दीर्घ श्वास घेणे ही सर्वात प्रभावी ‘मॅजिकल ट्रिक’ आहे. हे केल्याने मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
ताण कमी करणे
उच्च रक्तदाबाचे एक प्रमुख कारण म्हणजे मानसिक ताण. जेव्हा तुम्ही ताणात असता, तेव्हा तुमचे शरीर कॉर्टिसोल नावाचे हार्मोन तयार करते, ज्यामुळे रक्तदाब तात्पुरता वाढतो. नियमित ध्यान केल्याने या हार्मोनचे उत्पादन कमी होते.
advertisement
आहारात मिठाचे प्रमाण कमी करा
मीठ म्हणजे सोडियम रक्तदाब वाढवण्याचे एक मोठे कारण आहे. त्यामुळे, आहारात मिठाचे प्रमाण कमी करा. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि फास्ट फूड टाळा.
नियमित व्यायाम
रोज किमान 30 मिनिटे चालणे, धावणे किंवा योगा केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. नियमित व्यायाम केल्याने हृदय मजबूत होते आणि शरीराचे वजनही नियंत्रणात राहते.
पोटॅशियमयुक्त आहार
सोडियम कमी करण्यासोबतच पोटॅशियम असलेले पदार्थ खा. केळी, रताळे, पालक यांसारख्या पदार्थांमध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रणात मदत करते.
पुरेशी झोप
रोज रात्री 7 ते 8 तास शांत झोप घ्या. पुरेशी झोप न मिळाल्यास रक्तदाब वाढू शकतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)