पाली : उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू झाला आहे. मात्र, तरीही सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवत आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीत मागच्या वर्षीच्या तुलनेत एसीची 3 पट मागणी वाढली आहे. पण एसी खरेदी करताना जेव्हा लोक जातात, तेव्हा त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. बिल कमी येईल, किंवा विजेची बचत व्हावी आणि कुलिंगही चांगली करेल, असा एसी प्रत्येकाला हवा असतो.
advertisement
अशावेळी, तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार फाइव्ह स्टार रेटिंग असलेला एसी खरेदी करावा. वीजबिल कमी येण्यासोबतच याचे अनेक फायदे आहेत. घरात एसीला 24 ते 25 डिग्री तापमानात ठेवायला हवा. यामुळे वीजबिल कमी येते. तसेच कूलिंगही छान राहते.
रुम असा करावा थंड -
जर तुम्हाला असे वाटत असेल की, एसीचा वापर कमीत कमी करावा तर यासाठी थोडा वेळ एसी चालू करावा आणि मग त्यानंतर कमी स्पीडने पंखा चालवावा. यामुळे एसीचा थंडपणा सर्व खोलीत पसरेल आणि काही वेळानंतर तुम्हाला एसी बंद करावा लागेल. अशावेळी पंख्यामुळेही तुमचे काम होऊन जाईल.
देशभर त्यांचे भक्त, मोठमोठे मंत्रीही दरबारात लावतात हजेरी! कोण आहेत पंडित प्रदीप मिश्रा?
या गोष्टीची काळजी घ्यावी -
अनेकदा असे होते की, ज्या खोलीत एसी लावला आहे, त्यामध्ये इतर अनेक डिव्हाईसही वापरले जातात. यामुळे खोली थंड होण्यास वेळ लागतो आणि तुम्हाला कमी तापमानात एसी चालवावा लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रयत्न करावा की, ज्या खोलीत एसी सुरू आहे, त्या खोलीत फ्रीज आणि इतर वस्तू ठेवू नये. कारण, फ्रीजमधूनही उष्णता बाहेर पडत असल्याने खोली लवकर थंड होत नाही.
एसीचे तापमान किती असावे -
अनेकजण अचानक उष्णता जाणवल्यावर एसीचे तापमान 18 डिग्रीवर आणतात आणि मग त्याला कमी-जास्त करतात. अशावेळी तुम्ही प्रयत्न करावा की, 18 च्या जागेवर 24 डिग्री तापमानावर एसी ठेवावा. यामुळे तुम्हाला अचानक थंडपणा जाणवणार नाही. पण अगदी थोड्या वेळानंतर तुमची संपूर्ण खोली थंड होईल आणि यामुळे तुम्हाला वीजबिलही कमी येईल.
अलका याग्निक यांचा आजार बरा होऊ शकतो, डॉक्टरने केला मोठा दावा, या थेरपीबद्दल सांगितलं...
किती असावे तापमान -
अनेक अहवालांमध्ये समोर आले आहे की, एसीचे तापमान एकच असले किंवा स्थिर ठेवले तर त्याचा वीजबिलावर मोठा परिणाम पडतो. यामुळे एका डिग्रीवर कमीत कमी 6 टक्के वीजेचा परिणाम होते. जर तुम्ही थोडे जास्त तापमान वाढवले आहे तर यामुळे तुमच्या एसीमुळे येणाऱ्या वीजबिलावर 24 टक्के परिणाम होतो, असेही सांगितले जाते.