अलका याग्निक यांचा आजार बरा होऊ शकतो, डॉक्टरने केला मोठा दावा, या थेरपीबद्दल सांगितलं...
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अलका याग्निक यांचा आजार ठिक होऊ शकतो, असा दावा लखनऊ येथील मशहूर ईएनटी सर्जन डॉ. पंकज श्रीवास्तव यांनी केला आहे. लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले हे जाणून घेऊयात.
अंजली सिंह, प्रतिनिधी
लखनऊ : 90 च्या दशकातील मेलोडी क्वीन आणि 2500 पेक्षा जास्त गाणे गायलेल्या भारतातील प्रसिद्ध गायिका अलका याग्निक सध्या चर्चेत आहेत. त्यांना कानाचा दुर्मिळ असा आजार झाला आहे. यामुळे त्यांना ऐकायला येत नाहीये. या आजाराला वैद्यकीय भाषेत सेंसरी न्यूरल हियरिंग लॉस असे म्हटले जाते. पण हा आजार ठिक होऊ शकतो, असा दावा लखनऊ येथील मशहूर ईएनटी सर्जन डॉ. पंकज श्रीवास्तव यांनी केला आहे. लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले हे जाणून घेऊयात.
advertisement
लोकल18 च्या टीमशी बोलताना डॉ. पंकज श्रीवास्तव म्हणाले की, जर अलका याग्निक यांनी हायपरबेरिक ऑक्सिजन थेरेपी घेतली तर त्यांना खूप मदत मिळू शकते. या आजारात कालावधी हा खूप महत्त्वाचा असतो. त्या उपचार जितका उशिरा करतील, तितका त्यांचा हा आजार वाढेल. पण योग्य वेळी योग्य डॉक्टरकडून उपचार घेतल्यास त्यांचा हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण उपचारात उशिर केला तर कायमस्वरुपी पॅरालिसिसचा झटका किंवा अपंगत्व येऊ शकते.
advertisement
काय आहे सेंसरी न्यूरल हियरिंग लॉस आजार -
डॉ. पंकज श्रीवास्तव यांनी पुढे सांगितलं की, जेव्हा कोणी मोठ्या आवाजात संगीत ऐकतो तेव्हा त्याला या प्रकारच्या आजार होतो. आपण या आजाराला कानाच्या नसचा अर्धांगवायू (पॅरालिसिस) म्हणतो. यामध्ये अचानक रक्तपुरवठा हा कानाच्या नसमध्ये परिणाम होतो. विशेष म्हणजे हा आजार फक्त एका कानालाच प्रभावित करतो. हा आजार फक्त अशा लोकांना होतो, जे खूप मोठ्या आवाजात संगीत ऐकतात. या आजाराच्या उपचारांबद्दल बोलायचे तर, या आजारावर दोन प्रकारे उपचार केले जातात.
advertisement
आधी दुर्बिणीच्या आधारे रुग्णाच्या कानाच्या पडद्याच्या आत एक औषधी टाकली जाते. ही औषधी 5 वेळा टाकायला हवी आणि रुग्णाला एक तास रुग्णालयात थांबावे लागते. यामुळेही याप्रकारचा आजार हा खूप प्रमाणात बरा होतो आणि दुसरी पद्धत म्हणजे हायपरबेरिक ऑक्सिजन थेरेपीच्या माध्यमातून या प्रकारचा आजार हा बरा होतो.
advertisement
अशाप्रकारे काम करते ही थेरपी -
हायपरबेरिक ऑक्सिजन चेंबर प्रेशराइज चेंबर आहे, यामध्ये आपण 2.5 प्रेशर तयार करतो. म्हणजे 150 मीटर समुद्राखाली जितका प्रेशर तयार होतो आणि मग त्यामध्ये ऑक्सिजन घेतो. अशावेळी शरीरातील लाल पेशी पूर्णपणे समाधानी होतात. त्यासोबतच रक्तातील प्लाझ्मा असतात त्यातही ऑक्सिजन पूर्णपणे मिसळतो. अशा परिस्थितीत शरीरातील प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक भागात ऑक्सिजन पोहोचतो. यामुळे जुन्या खराब झालेल्या पेशी ठीक होतात. नवीन पेशी तयार होतात. यामुळे त्वचेसोबतच शरीरातील सर्व भाग सक्रिय होतात, अशी माहिती त्यांनी दिली.
Location :
Lucknow,Uttar Pradesh
First Published :
June 26, 2024 5:18 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अलका याग्निक यांचा आजार बरा होऊ शकतो, डॉक्टरने केला मोठा दावा, या थेरपीबद्दल सांगितलं...