advertisement

Javed Akhtar Struggle: "उपाशी राहिलो, फूटपाथवर झोपलो...", जावेद अख्तर यांनी सांगितला संघर्षाचा काळ

Last Updated:

ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी सुप्रसिद्ध कॉरियोग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान हिच्या ब्लॉगमध्ये हजेरी लावली होती. यावेळी जावेद अख्तर यांनी त्यांच्या स्ट्रगलच्या दिवसांवर भाष्य केले.

Javed Akhtar Struggle: "उपाशी राहिलो, फूटपाथवर झोपलो...", जावेद अख्तर यांनी सांगितला संघर्षाचा काळ
Javed Akhtar Struggle: "उपाशी राहिलो, फूटपाथवर झोपलो...", जावेद अख्तर यांनी सांगितला संघर्षाचा काळ
ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी सुप्रसिद्ध कॉरियोग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान हिच्या ब्लॉगमध्ये हजेरी लावली होती. फराह खान अलीकडेच जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या खंडाळ्यातील अलिशान बंगल्यामध्ये ब्लॉग बनवला आहे. फराह खानने तिच्या युट्यूब ब्लॉगमधून पहिल्यांदाच जावेद अख्तर यांच्या घराची झलक दाखवलीये.
खंडाळा मेन्शनमधील हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जावेद अख्तर हे फराह खानचे काका आहेत. जावेद अख्तर यांचं पहिल्यांदा फराहची मावशी हनी इराणी यांच्यासोबत लग्न झालं होतं. जावेद आणि हनी इराणी यांना झोया अख्तर आणि फरहान अख्तर अशी दोन मुले आहेत. त्यानंतर, हनी इराणी आणि जावेद अख्तर यांचा घटस्फोट झाला. हनीपासून विभक्त झाल्यानंतर जावेद यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासोबत लग्न केलं.
advertisement
जावेद अख्तर यांनी फराहच्या युट्यूब ब्लॉगमध्ये त्यांच्या खंडाळ्यातील बंगल्याविषयीची माहिती दिली, शिवाय त्यांच्या संघर्षाच्या दिवसांबद्दलही सांगितलं. व्हिडिओमध्ये शबाना यांनी खुलासा केला की, "त्यांनी (शबाना) ही संपत्ती 15 वर्षांपूर्वी खरेदी केली होती. पुढे शबाना म्हणाल्या की, "मला जेव्हा या आलिशान बंगल्याबद्दल कळलं तेव्हा मला या बंगल्याला वीकेंड कॉटेजमध्ये बदलायचं होतं. त्यामुळे या मुद्द्यावरून आम्ही दररोज भांडायचो." मग जावेद यांचा एक मित्र म्हणाला की, 'जावेद अख्तर म्हणजे शोले आणि तू म्हणजे अंकुर. या दोघांचं कधीही एकमत होऊ शकत नाही. त्यामुळे तू अंकुरला सोडून शोले बनव'
advertisement
स्ट्रगलच्या दिवसांबद्दल बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, "कधीकधी मला वाटतं की, हे माझ्यासोबत घडत आहे का? ज्यांच्या आयुष्यात काहीही नाही ते किती मस्त आयुष्य जगू शकतात. मी तीन दिवस जेवलो नाही म्हणून उपासमारीवर एक कविता लिहिली होती. तुम्ही मोठ्या घरात राहू शकता, पण तुमच्या आयुष्यात एक छोटी खोली आहे जी नेहमीच तुमच्यासोबत असते. मी त्यावेळी फूटपाथवरही झोपलो आहे."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Javed Akhtar Struggle: "उपाशी राहिलो, फूटपाथवर झोपलो...", जावेद अख्तर यांनी सांगितला संघर्षाचा काळ
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement