काहीवर्षांपूर्वी फक्त फोन कॉल्स आणि मेसेजपुरता मर्यादित असलेल्या मोबाईलने आता टीव्ही आणि लॅपटॉपची पण जागा घेतलीये. त्यामुळे मोबाईलचा वापर प्रचंड वाढलाय. सोशल मीडियावर टाईमपास करणं असो किंवा कोणती ऑनलाईन मीटिंग अथवा व्हिडिओ कॉन्फ्रसिंग असो, त्यासाठी मोबाईलचा वापर हा आलाच. अति तिथे माती या म्हणीप्रमाणे मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळे विविध आरोग्याचा समस्यांचा सामना करावा लागतोय. अशातच अनेकांना मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जाण्याची एक वाईट सवय लागलीये. जी आरोग्यासाठी प्रचंड धोक्याची ठरते आहे. जाणून घेऊयात मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जाण्याचे दुष्परिणाम.
advertisement
टॉयलेट , मोबाइल फोन आणि बॅक्टेरिया :
टॉयलेट ही एक अशी जागा आहे जिथे वायरस आणि बॅक्टेरिया सर्वाधिक असतात. त्यामुळे स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर हायपाय स्वच्छ धुण्याचा सल्ला आपले पालक आपल्याला देत होते. मात्र आता पाश्चिमात्य कमोडवर बसून ब्रश करणं, मोबाईलमधले गेम खेळणं किंवा रिल्स बघत बसण्याचे प्रकार वाढू लागलेत. त्यामुळे वॉशरूम मधल्या बॅक्टेरिया आणि वायरसमुळे होणाऱ्या त्रासाचं आणि संक्रमणाचं प्रमाण सुद्धा वाढू लागलंय. कारण जेव्हा आपण टॉयलेटमध्ये मोबाइल फोन जातो, तेव्हा वॉशरूममध्ये उपस्थित असलेले बॅक्टेरिया आणि वायरस फोनवरच राहतात. जरी आपण हात स्वच्छ धुतले तरी आपण फोन धुवू शकत नाही. त्यामुळे फोनवर असलेले बॅक्टेरिया आणि वायरस शरीरात प्रवेश करून विविध आजारांना किंवा त्वचेवर राहून विविध त्वचाविकारांना कारणीभूत ठरू शकतात.
धोकादायक रेडिएशन :
स्मार्टफोन मधून निघणारं रेडिएशन हे आरोग्यासाठी धोकादायक असतं हे आपण जाणतोच. त्यामुळे टॉयलेटमध्ये मोबाईल फोनचा जेव्हा वापर केला जातो तेव्हा रेडिएशन, जीवाणू आणि विषाणू या तिघांचा एकत्रित धोका आपल्या शरीराला असतो. ज्यामुळे डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, थकवा, मानसिक ताण अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम :
टॉयलेटमध्ये मोबाईल फोनच्या सततच्या वापरामुळे मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. मुळातच टॉयलेट ही काही मनोरंजनाची जागा नाही. मात्र तिथेही मोबाईल फोनचा वापर होत असल्यामुळे हळूहळू मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम दिसून येतो. याशिवाय मोबाईल बघण्यात वेळ जास्त असल्यामुळे तुमची दुसरी कामं खोळंबून राहतात. जी तुम्हाला पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ ऑफिसमध्ये थांबावं लागू शकतं किंवा ही कामं टाळण्याची सवय तुम्हाला लागू शकते.
झोपेची गुणवत्ता कमी होणं :
आपण अनेकदा सहजपणे म्हणतो की, माझी झोप पूर्ण होत नाही, कितीही झोपलो तरी थकल्यासारख वाटतं. याला कारणीभूत आहे तो मोबाईल. मुळातच रेडिएशनच्या दुष्परिणामांमुळे मोबाईलचा वापर जितका कमी होईल तितका तो आरोग्यासाठी फायद्याचा आहे. मात्र टॉयलेटमध्येही मोबाईल घेऊन गेल्यामुळे आरोग्याला दुहेरी धोके निर्माण होतात. याशिवाय याचा विपरीत परिणाम मानसिक आरोग्यावर होऊन झोपेची गुणवत्ता देखील खालावते.
मोबाईलच्या अतिवापराचे आणि टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन जाण्याचे दुष्परिणा जाणून घेतल्यानंतर आता समजून घेऊयात ही सवय कशी बदलायची ते.
कशी बदलायची सवय ?
फोन बाहेर ठेवा : जेव्हा केव्हा तुम्हाला टॉयलेट जायचं असेल तेव्हा तुम्ही तुमचा फोन चार्जिंगला लावून जा. याचे 3 फायदे होती. एक म्हणजे तुमच्या फोनला वायरस, बॅक्टेरियाच्या संक्रमणांचा धोका राहणार नाही. फोन नसल्यामुळे तुम्ही वॉशरूमध्ये अतिरिक्त वेळ वाया घालवणार नाहीत आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही जाऊन परत येई पर्यंत तुमचा फोन चार्ज झालेला असेल.
वेळ मर्यादा ठरवून घ्या : अनेकांना कल्पनाही नसेल की, मोबाईलच्या अतिवापरामुळे त्याचा बहुमूल्य वेळ हा टॉयलेटमध्ये फुकट जात होता. तो आता जरूर वाचेल. शिवाय तुम्हाला वैयक्तिक स्वच्छतेसाठी किती वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही वेळ मर्यादा ठरवून घेऊ शकता.