Vastu Tips: टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन बसण्याची सवय..? कुंडलीतील बुध असा देईल त्रास

Last Updated:

Vastu Tips Marathi: वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये फोन वापरल्याने बुध ग्रहाला हानी पोहोचते. वास्तविक, स्नानगृह 12 व्या घराचे प्रतिनिधित्व करते आणि 12व्या घरात बुध कमजोर असतो.

News18
News18
मुंबई : आजकालच्या जमान्यात मोबाईलशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येत नाही. घर, ऑफिस किंवा अन्य काही ठिकाणी, तसेच टॉयलेटमध्येही लोक सोशल मीडिया किंवा बातम्या पाहण्यासाठी फोन सोबत ठेवतात. आपलीही अशा लोकांमध्ये गणना होत असेल तर तुमची ही सवय वेळीच सुधारा.
टॉयलेटमध्ये बसून तासनतास मोबाईलवर व्हिडिओ, चित्रपट, शो पाहणारे लोक नकळत अनेक आजारांना आमंत्रण देत असतात. टॉयलेटमध्ये मोबाईलचा नियमित वापर केल्यास त्वचा, मूळव्याध आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊया.
टॉयलेटमध्ये फोन वापरू नये : वास्तुशास्त्रानुसार, बाथरूममध्ये फोन वापरल्याने बुध ग्रहाला हानी पोहोचते. वास्तविक, स्नानगृह 12 व्या घराचे प्रतिनिधित्व करते आणि 12व्या घरात बुध कमजोर असतो, त्यामुळे ज्या व्यक्तीचा बुध ग्रह खराब असतो त्यांच्या जीवनात हळूहळू समस्या येऊ लागतात. याशिवाय त्याचे संवाद कौशल्यही ढासळू लागते, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतो आणि तो लोकांसमोर आपले मत उघडपणे मांडू शकत नाही. याशिवाय बुध ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात, जसे की त्वचेवर डाग दिसणे, त्वचा काळवंडणे इत्यादी.
advertisement
मोबाइल फोनशी संबंधित वास्तू नियम: वास्तुशास्त्रामध्ये फोनशी संबंधित आणखी अनेक नियम स्पष्ट केले आहेत. उदाहरणार्थ, वास्तुशास्त्रानुसार, फोनच्या कव्हरवर कधीही देवाचे चित्र लावू नये. यामुळे देवी-देवता रुष्ट होऊ शकतात, त्यामुळे व्यक्तीला जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मोबाइल वॉलपेपरवर हिंसक प्राण्यांची चित्रे कधीही वापरू नयेत. यामुळे व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होते आणि तो इच्छा नसतानाही चुकीच्या गोष्टी करू लागतो.
advertisement
मोबाईलशी संबंधित इतर वास्तु नियम जे लक्षात ठेवले पाहिजेत:
1. मोबाईल हा अग्नि तत्वाशी संबंधित मानला जातो, त्यामुळे त्याच्या जवळ पाणी ठेवू नये. असे केल्याने आयुष्यात अशुभ होण्याची शक्यता वाढते.
2. चहा किंवा कॉफी मोबाईल जवळ ठेवू नये.
3. मोबाईल जास्त वेळ वापरू नये. असे केल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते.
4. घराच्या उत्तर-पूर्व दिशेला मोबाईल चार्जवर ठेवू नये.
advertisement
5. मोबाईल वायव्य दिशेला ठेवून चार्ज करू नये.
6. मोबाईल पर्स किंवा बॅगेत ठेवावा. हे करता येत नसेल तर ते मागच्या खिशात ठेवावा.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन बसण्याची सवय..? कुंडलीतील बुध असा देईल त्रास
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement